ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली:खासदार रवींद्र वायकरांनी दिली माहिती; कोकण रेल्वेचा मार्गही बदलणार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतून कोकणात जाणारी ट्रेन रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणेच दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. ही मागणी रेल्वे खात्याने फेटाळून लावली असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर भविष्यात कोकणात जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेनचा मार्गही बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर ट्रेन बंद करण्यात आली होती. ही ट्रेन आता फक्त दिवा स्थानकापर्यंतच येते आणि येथूनच सुटते. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करण्यात यावी अशी मागणी मनसेने केली होती. त्यानुसार शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कोकणातील पदाधिकारीही होते. खासदार रवींद्र वायकर यांनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे रत्नागिरी ते दादा किंवा सीएसएमटी अशीह ट्रेन सुरू करण्याच्या मागणीचे पत्र दिले. यावर मंत्री वैष्णव यांनी अशी सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन आता दादर स्थानकपर्यंत येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार रवींद्र वायकर काय म्हणाले? मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर खासदार रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सध्याची रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही आता पश्चिम रेल्वेमार्गावरून वसईला जाईल. पुढे वसईवरून पनवेलमार्गे ही ट्रेन कोकणात जाईल. आता दादर-रत्नागिरी ट्रेन सुरू करणे शक्य नाही. दीड ते दोन वर्षात नव्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर कोकणात जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन या नव्या मार्गानेच जातील. पुढील एक-दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला नवीन मार्ग मिळणार आहे. त्यामुळे आता यामध्ये राजकारण आणू नये, असे आवाहनही वायकर यांनी यावेळी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर