ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मित्रांसोबतची कोकण ट्रीप ठरली अखेरची:स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणे बेतले जीवावर, डोकं तळाला आदळल्याने तरुणाचा मृत्यू

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापूरच्या एका २५ वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ४ फूट खोल असलेल्या पूलमध्ये उंचावरून मारलेली उडी या तरुणाच्या जीवावर बेतली. श्रेणीक मिलिंद टाकळे (वय २५, रा. इसलामपूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत आनंदाने सुरू असलेल्या या कोकण पर्यटनाचा असा भयावह शेवट झाल्याने टाकळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कागल तालुक्यातील १० मित्रांचा एक ग्रुप सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालवणमधील वायरी भागात आला होता. ते सर्वजण येथील ‘मालवणी पाहुणचार रिसॉर्ट’मध्ये मुक्कामास होते. दुपारच्या सुमारास काही मित्र खोलीत विश्रांती घेत होते, तर श्रेणीक आणि त्याचे काही सहकारी रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत होते. याच दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने एक मोठी दुर्घटना घडली. पूलच्या ज्या भागात लहान मुलांसाठी अवघी ४ फूट खोली होती, तिथे श्रेणीकने सुमारे ८ ते १० फूट उंचावरून थेट खाली उडी मारली. खोली अत्यंत कमी असल्याने श्रेणीकचे डोके थेट पुलाच्या सिमेंटच्या तळाशी जाऊन प्रचंड वेगाने आदळले. या अंतर्गत धडकेमुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो पाण्यातच बेशुद्ध झाला. गाण्यावर डान्स सुरू असतानाच घडला अनर्थ धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी हा अपघात घडला, त्या वेळी रिसॉर्टवर इतर मित्र ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’ या प्रसिद्ध गाण्याच्या धूनवर बेधुंद होऊन नाचत होते. एका बाजूला मित्रांचा जल्लोष सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला श्रेणीकचा स्विमिंग पूलमध्ये डोके आदळून जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण थरारक प्रकार तिथे असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मित्राचा अपघात झाल्याचे लक्षात येताच डान्स करणारे मित्र तात्काळ पुलाच्या दिशेने धावले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली श्रेणीकला तातडीने पाण्यातून बाहेर काढून मित्रांनी मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. अविवाहित असलेल्या श्रेणीकच्या अचानक जाण्याने त्याच्या मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच श्रेणीकचे वडील आणि कुटुंबीय रात्री उशिरा मालवणमध्ये दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा रीतसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. मालवण पोलिस ठाण्यात या प्रकरणाची ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जितेंद्र पेडणेकर पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे पर्यटनाच्या ठिकाणी अतिउत्साहाच्या भरात सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर