ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बदलापूर ‘बीजांड विक्री’ रॅकेट प्रकरण:दोषींवर कठोर कारवाई केली जाणार, राज्यमंत्री योगेश कदम आक्रमक

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातील बीजांडांची बेकायदेशीररीत्या काढणी व विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या गंभीर प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. आमदार चित्रा वाघ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेद्वारे या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांच्या शोषणाचा हा प्रकार अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत, या रॅकेटमधील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, हा विषय अत्यंत गंभीर असून या प्रकरणात काही आयव्हीएफ सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील एका घरावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला असता तेथे कोणतेही अधिकृत आयव्हीएफ केंद्र नसल्याचे आढळून आले. नाशिकमधील एका नोंदणीकृत केंद्राशी संबंधित डॉक्टरांच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात सुमारे दहा महिला पीडित असल्याची माहिती त्यांनी दिली. सरोगसी कायदा 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या राज्य मंडळाच्या समित्यांद्वारे आयव्हीएफ केंद्रांची तपासणी केली जाते. मात्र बदलापूर येथील प्रकरणात खोट्या आधार कार्डाचा वापर करून एकाच महिलेची वेगवेगळ्या नावांनी वारंवार नोंदणी करून बीजांड काढल्याचा धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले की, राज्यातील सुमारे 860 आयव्हीएफ केंद्रांची गृह आणि आरोग्य विभागामार्फत संयुक्त तपासणी केली जाईल आणि अशा प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणातील संबंधित डॉक्टरांना आधीच अटक करण्यात आली असून, महिलांच्या शोषणाचे हे रॅकेट मुळापासून उपटून टाकण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले, या प्रकरणात करण्यात आलेल्या सोनोग्राफी अनधिकृत होती आणि संबंधित सोनोग्राफी केंद्रावरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच नाशिकमधील नोंदणीकृत आयव्हीएफ केंद्रातून औषधे मिळवून त्यांचा गैरवापर झाल्याचेही निदर्शनास आले आहे. आयव्हीएफ केंद्रांना मान्यता देताना तज्ज्ञ समित्या नियमितपणे आणि रँडम तपासण्या करत असतात. त्यामुळे स्वतंत्र समिती नेमण्याची आवश्यकता नाही. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक असल्यास बायोमेट्रिक पडताळणीची व्यवस्था करण्याचाही विचार करता येईल, असे कदम म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर