ब्रेकिंग न्यूज
⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं… ✦ ⚡ Government Employees News | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, सणासाठी मिळणार 20 हजार रुपये ✦ ⚡ 61 तासांच्या संघर्षानंतर अखेर तोडगा! राजू शेट्टींची मोठी घोषणा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार? ✦ ⚡ बंद फ्लॅट हेरले, कटरने कड्या कापल्या अन् एकाच रात्रीत…, छ. संभाजीनगरात चोरट्यांचा धुमाकूळ ✦ ⚡ हॉटेलमध्ये जेवन केलं, बाहेर येताच काळानं गिळलं, मित्राला वाचवायला गेला अन्…, सांगलीत हळहळ ✦ ⚡ एल निनोच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी धामणीत वनराई बंधाऱ्याची उभारणी!
SP News Maregaon

MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो परीक्षार्थींना दिवाळी सणाच्या तोंडावर राज्य सरकारने खूशखबर दिली दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जास्तीच्या जागा मिळायला हव्यात अशी मागणी परीक्षार्थी करीत होते. अखेर राज्य सरकारने एमपीएससी गट क परीक्षेतील पदसंख्येत मोठी वाढ केली आहे.

एमपीएससी गट-क परीक्षेतील पदसंख्येत वाढ करून ५ हजार ७०७ पदांमध्ये आणखी ११,०१० पदांची भर पडली आहे. आता एकूण १६ हजार ७१७ पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी आणि अतिरिक्त मागणीपत्रांनुसार पदसंख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आधी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही
उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत १ वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे. नव्याने अर्ज आणि संवर्गांचे विकल्प सादर करण्यासाठी १३ ते २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली असून आधी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही.
ऑफलाइन पद्धतीने परीक्षा, ३ जानेवारीऐवजी आता २४ जानेवारीला परीक्षा
सर्व संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. ऑफलाइन (OMR) पद्धतीने परीक्षा होणार आहे. पूर्वीचा अभ्यासक्रम कायम ठेवून काही संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून ३ जानेवारीऐवजी आता २४ जानेवारी २०२७ रोजी परीक्षा होणार आहे.
एमपीएससी गट क परीक्षेचा अर्ज कसा करायचा
-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsconline.gov.in/candidate या पोर्टलला भेट द्या
-जर तुम्ही यापूर्वी MPSC वर नोंदणी केली नसेल, तर ‘New User Registration’ वर क्लिक करून मोबाईल -नंबर, ईमेल आयडी आणि ओळखपत्राच्या मदतीने नवीन प्रोफाइल तयार करा
आधीच खाते असल्यास, तुमच्या ‘User ID’ आणि ‘Password’ द्वारे लॉग इन करा
-डॅशबोर्डवरील ‘Online Application’ सेक्शनमध्ये जाऊन MPSC Group C परीक्षेच्या जाहिरातीची लिंक निवडा.
-तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, संपर्क तपशील आणि प्रवर्ग (Category) अचूक भरा
-आयोगाच्या नियमानुसार तुमचा पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी (Signature) स्कॅन करून अपलोड करा
-तुमच्या सोयीनुसार परीक्षेचे केंद्र (Examination Center) निवडा
-डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करा
-सर्व माहिती पुन्हा तपासून अर्ज Submit करा

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर