ब्रेकिंग न्यूज
⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं… ✦ ⚡ Government Employees News | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, सणासाठी मिळणार 20 हजार रुपये ✦ ⚡ 61 तासांच्या संघर्षानंतर अखेर तोडगा! राजू शेट्टींची मोठी घोषणा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार? ✦ ⚡ बंद फ्लॅट हेरले, कटरने कड्या कापल्या अन् एकाच रात्रीत…, छ. संभाजीनगरात चोरट्यांचा धुमाकूळ ✦ ⚡ हॉटेलमध्ये जेवन केलं, बाहेर येताच काळानं गिळलं, मित्राला वाचवायला गेला अन्…, सांगलीत हळहळ ✦ ⚡ एल निनोच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी धामणीत वनराई बंधाऱ्याची उभारणी!
SP News Maregaon

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू!

41 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची खैर नाही; हेल्मेट वापरण्याचे ठाणेदार सागर दानडे यांचे वाहनधारकांना आवाहन

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मारेगाव पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम हाती घेण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे.दिवाळीच्या काळात बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढते. अशा परिस्थितीत मद्यप्राशन करून वाहन चालविणे स्वतःसह इतरांच्या जीवितालाही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मद्यप्राशन करून दुचाकी किंवा अन्य कोणतेही वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्यास संबंधित चालकाविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
हेल्मेट वापरा, कुटुंबाची काळजी घ्या!
दुचाकीस्वारांनी प्रवासादरम्यान हेल्मेटचा अनिवार्यपणे वापर करावा. वाहतुकीचे नियम पाळावेत आणि वेगावर नियंत्रण ठेवावे. दिवाळीचा आनंद साजरा करताना स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच आपल्या कुटुंबीयांचाही विचार करावा. घरातून बाहेर पडलेला आपला माणूस सुरक्षितपणे घरी परतणे हीच कुटुंबासाठी खरी दिवाळी आहे, असा मोलाचा संदेश पोलिसांकडून देण्यात येत आहे.
दरम्यान, मारेगावचे ठाणेदार सागर दानडे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या असून, सण उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सणाच्या आनंदाला अपघाताचे गालबोट लागू नये, यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दारू पिऊन वाहन चालवू नका, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नका आणि सुरक्षित दिवाळी साजरी करा, हाच मारेगाव पोलिसांचा नागरिकांना संदेश आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर