ब्रेकिंग न्यूज
⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं… ✦ ⚡ Government Employees News | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, सणासाठी मिळणार 20 हजार रुपये ✦ ⚡ 61 तासांच्या संघर्षानंतर अखेर तोडगा! राजू शेट्टींची मोठी घोषणा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार? ✦ ⚡ बंद फ्लॅट हेरले, कटरने कड्या कापल्या अन् एकाच रात्रीत…, छ. संभाजीनगरात चोरट्यांचा धुमाकूळ ✦ ⚡ हॉटेलमध्ये जेवन केलं, बाहेर येताच काळानं गिळलं, मित्राला वाचवायला गेला अन्…, सांगलीत हळहळ ✦ ⚡ एल निनोच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी धामणीत वनराई बंधाऱ्याची उभारणी!
SP News Maregaon

पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं…

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर : स्वतःचे पहिले लग्न झालेले असतानाही ते लपवून एका विधवा महिलेला लग्नाचे आश्वासन देत तिची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंधातून महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नाही तर वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून पाच लाख रुपयेही घेतले. मात्र, महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. तसेच शिवीगाळ आणि मारहाण केल्याचाही आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‎पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, 29 वर्षीय महिलेचे 2013 मध्ये लग्न झाले होते. मात्र, 2019 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ती आपल्या दोन मुलांसह माहेरी राहत होती. याचदरम्यान तिचा नातेवाईक असलेल्या जनार्धन बुद्धाजी खरात (वय 35, रा. वलखेड, ता. परतूर, जि. जालना, सध्या रा. जोगेश्वरी) याचे तिच्या माहेरी येणे-जाणे होते. या ओळखीतून दोघांची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले.

बंद फ्लॅट हेरले, कटरने कड्या कापल्या अन् एकाच रात्रीत…, छ. संभाजीनगरात चोरट्यांचा धुमाकूळ

‎25 एप्रिल 2023 रोजी खरात याने महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तिला वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे आणले आणि तेथे भाड्याने खोली घेऊन राहण्याची व्यवस्था केली. याच ठिकाणी त्याने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिला आपल्या दोन मुलांसह त्याच्यासोबत राहू लागली. मात्र, एकत्र राहत असतानाही तो लग्न करण्याबाबत टाळाटाळ करीत होता.

दरम्यान, त्याने महिलेकडून वेगवेगळी कारणे सांगून एकूण पाच लाख रुपये घेतले. मात्र, पैसे परत मागितल्यानंतरही तो टाळू लागला. लग्नाबाबत विचारणा केल्यावर तो ठोस उत्तर देत नव्हता. उलट किरकोळ कारणांवरून शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

‎सततच्या त्रासाला कंटाळून अखेर 28 जुलै 2026 रोजी महिला त्याच्यापासून वेगळी झाली आणि माहेरी निघून गेली. त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी ती सेलू परिसरात भाड्याच्या घरात राहू लागली. दरम्यान, तिने संबंधित व्यक्तीविरोधात महिला समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर समुपदेशनासाठी खरात हा आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह केंद्रात हजर झाला. त्यावेळी त्याचे यापूर्वीच लग्न झालेले असून त्याला पाच अपत्ये असल्याचे महिलेला समजले. आपल्यापासून ही बाब लपवून ठेवल्याचे समोर आल्यानंतर महिलेने जनार्धन बुद्धाजी खरात याच्याविरोधात सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

‎दरम्यान, ही घटना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सेलू पोलिसांनी हा गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलिसांकडे वर्ग केला. महिलेच्या तक्रारीवरून ३५ वर्षीय खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर