ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

भालेवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचा पुढाकार


सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील भालेवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम सुरू असून, या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याची पातळी वाढवून शेती उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण कचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिक व शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे. या वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यावेळी भालेवाडी येथील शेतकरी रस्से  यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारेल. परिणामी पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल.

तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पाण्याची पातळी वाढल्यास पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो. जलसंधारणाच्या अशा उपक्रमांमुळे शेतीत आमूलाग्र बदल घडू शकतो. शेतकऱ्यांनी पुढे येऊन अशा कामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकसहभागातून साकार होत असलेला हा वनराई बंधारा भालेवाडी परिसरातील शेतीसाठी वरदान ठरणार असून, जलसंधारणाच्या दृष्टीने हा उपक्रम आदर्श ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर