बातमी ऐका (Marathi Voice Reader)
India vs New Zealand 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज, शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी वेलिंग्टनमधील हेन्री स्टेडियमवर खेळला जाईल. पहिला सामना टीम इंडियाने खिशात घातला. पण दुसऱ्या सामन्यात, वेलिंग्टनमधील हवामानामुळे आजच्या सामन्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. स्थानिक वेळेनुसार सामना सुरू झाल्यापासून मैदानावर काळे ढग राहतील. पावसामुळे टॉसला विलंब झाला. टॉस जिंकून टीम इंडियाने बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
कसं असेल संपूर्ण मॅचमध्ये वातावरण?
वेलिंग्टनवर दुपारी सुरू झालेला पाऊस रात्रीपर्यंत पडू शकतो, पण हवामान अधूनमधून निवळू शकते, परंतु पावसाची विश्रांती मॅच पूर्ण खेळवण्यासाठी पुरेसे नसेल, असा अंदाज वर्तविला जातोय. स्थानिक वेळेनुसार, दुपारी 3 वाजता पावसाची शक्यता 55 टक्के आहे. दुपारी 4 वाजता पावसाची शक्यता 60 टक्क्यांपर्यंत वाढेल. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत पावसाची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे दोन तासाच्या विलंबानंतर टॉस झाला. तसेच संध्याकाळी 8 नंबर पावसाची पुन्हा शक्यता असल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे.
#TeamIndia have won the toss and elect to bowl first in the 2nd ODI at Hnry Stadium, Wellington.
Same XI as the first game for 🇮🇳
Live – https://t.co/pxZRYf6dYV #NZvIND https://t.co/6D0MpgXuZh
— BCCI (@BCCI) November 7, 2026
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा, शुभमन गिल (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर (VC), केएल राहुल (WK), अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर बरार, अर्शदीप सिंह.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन – विल यंग, टिम सेफर्ट, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (WK), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (C), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर.