ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

हुमणी अळी व्यवस्थापनासाठी प्रकाश सापळा वापरा: कृषि विभागाचे आवाहन

6 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यात गावा गावांमध्ये खरीपपूर्व नियोजन व हुमणी अळी व्यस्थापन बाबत सभा घेऊन शेतकऱ्यांना एकात्मिक पिक व्यवस्थापनाबाबत जागृती निर्माण करण्याची मोहीम सुरू आहे. मागील वर्षी तालुक्यात तुरळक ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता, यावर्षीही काही ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रकाश सापळा वापरण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी केले आहे.

नुकताच चोपण येथे सुधीर खिरटकर यांचे शेतावर झालेल्या खरीपपूर्व नियोजन सभेत तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी एल निनो च्या पार्श्वभूमीवर लागवडीचे नियोजन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी हुमणी अळीचे जिवनचक्र, नुकसानीची पद्धत आणि व्यवस्थापन करिता प्रकाश सापळ्यांचा प्रभावी वापर बाबत शेतकऱ्यांना संबोधित केले.

उपकृषी अधिकारी लोणीकर यांनी फळबाग लागवड अर्थशास्त्र व फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाच्या योजना समजावून सांगितल्या. उपकृषि अधिकारी देठे यांनी प्रकाश सापळ्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच उपकृषी अधिकारी कोषटवार यांनी महाविस्तार ए आय बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. सहायक कृषि अधिकारी विवेक पारधी यांनी सभेचे उत्कृष्ट नियोजन करून प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. सदर सभेस सहायक कृषि अधिकारी नकुल थोरात व रोहित जुमनाके यांचेसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर