ब्रेकिंग न्यूज
⚡ Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या घरी दरोडा? बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् सत्य समोर आल्यावर सगळ्यांना बस… ✦ ⚡ ठाणे हादरलं! भाड्याच्या वादातून रिक्षाचालकाला संपवलं, नातेवाईकांच्या आरोपाने खळबळ ✦ ⚡ महिलांसाठी सुवर्णसंधी! 45 दिवसांचं मोफत प्रशिक्षण घ्या आणि हातमागावर बनवा पैठणी, फायद्याची योजना काय? Video… ✦ ⚡ Pandharpur: ‘5 मिनिटं थांबलो असतो तर माझाही जीव…’ विहीर दुर्घटनेतून कसा वाचला 16 वर्षांचा शुभम, सांगितला… ✦ ⚡ दिवाळीला मुलगी घरी आलेली, आईच्या फोनवर व्हिडिओ कॉल, पण संशय बळावला अन् अनर्थ टळला, नाशिकात खळबळ ✦ ⚡ पारंपरिक शेतीची वाट सोडली, बोर लागवडीचा केला यशस्वी प्रयोग, वर्षाला निव्वळ 6 लाख नफा, Video ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका!
SP News Maregaon

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या घरी दरोडा? बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् सत्य समोर आल्यावर सगळ्यांना बस…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई: ठाण्यातील दिवा शहरात मंगळवारी पहाटे घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सनदी अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याच घरी दरोडा पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. मात्र, या सर्व प्रकरणात नावातील साधर्म्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचे तपासात समोर आले आहे.
काय आहे नेमका प्रकार?
दिवा शहरातील आगासनगाव परिसरात स्थानिक उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांचा आलिशान बंगला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्यात दरोडा टाकला. चोरट्यांनी घरातील अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.

मात्र, घरमालकाचे नाव आणि आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचे नाव एकच असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड गैरसमज झाला. सोशल मीडियावर ‘तुकाराम मुंढे यांच्या घरी चोरी’ अशी वार्ता तुफान व्हायरल झाली. "FDA आयुक्त आपल्याच परिसरात राहतात आणि आम्हाला कशी माहिती नाही?" असा प्रश्न अनेकांना पडला. या अफवेमुळे खुद्द प्रशासकीय यंत्रणाही काही काळ गडबडून गेली होती.
मुंब्रा पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रं फिरवली आहेत. या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. नावातील एकाच साम्यामुळे एका रात्रीत एका उद्योजकाची घरफोडी राज्यभरात चर्चेचा विषय ठरली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर