ब्रेकिंग न्यूज
⚡ Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या घरी दरोडा? बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् सत्य समोर आल्यावर सगळ्यांना बस… ✦ ⚡ ठाणे हादरलं! भाड्याच्या वादातून रिक्षाचालकाला संपवलं, नातेवाईकांच्या आरोपाने खळबळ ✦ ⚡ महिलांसाठी सुवर्णसंधी! 45 दिवसांचं मोफत प्रशिक्षण घ्या आणि हातमागावर बनवा पैठणी, फायद्याची योजना काय? Video… ✦ ⚡ Pandharpur: ‘5 मिनिटं थांबलो असतो तर माझाही जीव…’ विहीर दुर्घटनेतून कसा वाचला 16 वर्षांचा शुभम, सांगितला… ✦ ⚡ दिवाळीला मुलगी घरी आलेली, आईच्या फोनवर व्हिडिओ कॉल, पण संशय बळावला अन् अनर्थ टळला, नाशिकात खळबळ ✦ ⚡ पारंपरिक शेतीची वाट सोडली, बोर लागवडीचा केला यशस्वी प्रयोग, वर्षाला निव्वळ 6 लाख नफा, Video ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका!
SP News Maregaon

ठाणे हादरलं! भाड्याच्या वादातून रिक्षाचालकाला संपवलं, नातेवाईकांच्या आरोपाने खळबळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ठाणे: रिक्षाच्या क्षुल्लक भाड्याच्या वादातून चालकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील कळवा पूर्व परिसरातून पुढे आला आहे. बाबासाहेब जानराव असे ४३ वर्षीय मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. दिनेश घाडी आणि प्रेम राजपूत यांनीच मारहाण करून ठार मारल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

बाबासाहेब जानराव हे कळव्यातील आतकोनेश्वरनगर परिसरात एकटे राहात होते. ते भाडेतत्त्वावर रिक्षा चालवत. रविवारी रिक्षाच्या भाड्यावरून रिक्षामालक दिनेश घाडी आणि त्याच्यासोबतच्या एका व्यक्तीसोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर तिघेही घराबाहेर गेले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास बाबासाहेब अत्यंत जखमी अवस्थेत एका झुडपात सापडले. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दिवाळीत फटाके फोडताना भयंकर घडलं, साडीने पेट घेतला, पतीच्या डोळ्यादेखत सगळं संपलं, नाशिक हळहळलं!

डोक्याला, हाता-पायाला जखमा

बाबासाहेब यांच्या अंगावर जखमा होत्या. डोक्याला, हाताला आणि पायाला मार लागला होता. जखमी अवस्थेतच त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सुनीता यांनी दिनेश घाडी आणि प्रेम राजपूत यांच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर