ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

विकास लवांडेंना अखेर अटक; वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवलं:अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द होताच पोलिसांची कारवाई

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने मुदतवाढीचा अर्ज फेटाळून लवांडे यांचे संरक्षण काढून घेतल्याने वाघोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे राजकीय आणि वारकरी वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा दावा विकास लवांडे यांनी केल्याचा आरोप होता. या वक्तव्याविरोधात नलिनी आशिष वायाळ (वय 41, रा. येरवडा) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लवांडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने यापूर्वी 20 मेपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच तपास अधिकारी, सरकार पक्ष आणि वाघोली पोलिसांना याबाबत भूमिका मांडण्याचे निर्देशही देण्यात आले होते. दरम्यान, तपासादरम्यान विकास लवांडे यांनी अटकपूर्व जामिनाच्या अर्जात स्वतःविरोधातील पूर्वी दाखल असलेल्या 4 गुन्ह्यांची माहिती लपविल्याचे समोर आले. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात यावर जोरदार आक्षेप घेत लवांडे यांचे संरक्षण रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत लवांडे यांना अटक केली. आळंदी येथे झाली होती शाईफेक दरम्यान, 9 मे रोजी लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथे विकास लवांडे यांच्यावर शाईफेक आणि पिस्तूल दाखवून धमकावल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता लवांडे यांच्या अटकेमुळे हे संपूर्ण प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर