ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

यवतमाळ मुलींच्या तस्करी प्रकरणात दुसरी ऑडिओ क्लिप समोर:बनावट आधार कार्ड आणि डिलीट केलेल्या डेटाचा क्लिपमध्ये उल्लेख

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यवतमाळ मुलींच्या तस्करी प्रकरणी यापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. बनावट आधार कार्डच्या मदतीने मुलींची तस्करी केली जायची, अशी माहिती कॉलवर बोलणाऱ्या एका तरुणीने दिली होती. तसेच यात खूप पैसा असल्याचे देखील ती म्हणताना ऐकू आले होते. आता याच प्रकरणातील आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी ही ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली आहे. यवतमाळचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण म्हणाले, आम्ही आता दुसरी ऑडिओ क्लिप दिली आहे. याच व्यक्तींचा उल्लेख ज्या पहिल्या ऑडिओ क्लिपमध्ये होता, त्याच व्यक्तींचा उल्लेख दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये आढळून आला आहे. उज्जैनमध्ये सुद्धा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे. यात बोलणारी मुलगी स्वतः मान्य करते की तिच्या मोबाईलमध्ये अनेकांचे फोटो, अनेकांचे नंबर, अनेकांचे नाव होते. परंतु, पोलिसांच्या धाकामुळे ते वेळोवेळी डिलीट केले. या सर्व डेटाला जर रिकव्हर केले तर पोलिसांना योग्य दिशा मिळू शकेल. दुसऱ्या ऑडिओ क्लिपमधील संवाद (दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही) मुलगा: असं म्हणजे किती वर्षांची पोरगी नेत आसन?
मुलगी: कितीबी. आधार कार्डवर आपले एज (वय) वेगळे टाकते न.
मुलगा: असंय का?
मुलगी: हं.. आधार कार्ड बदलून देते न शुभम मामा. दुसरं बनवून देत असते. नकली आधार कार्ड.
मुलगा: अच्छा.
मुलगी: काय फायदा असे कामं करून?
मुलगा: तुला येत असते का पोरींचा फोटो?
मुलगी: माझ्याच हेच्यावर येत असते. माझ्याच मोबाईलवर फोटो येत असते.
मुलगा: पोरीचा?
मुलगी: माझ्याकडे खूप फोटो येत असते. मी फोनमध्ये लई फोटो असते.
मुलगा: हो का?
मुलगी: अशी केस वगैरे काही झाली पोलिसांची. आता मागं अहमदाबादचे पोलिस घेऊन येणार होते घरी. तर असं काही झालं तर आता माझं 18 वर्ष पूर्ण नाही न, मला नेते न जेलामध्ये विचारपूस करायले. मंग माझ्या मोबाईलमधून मी सगळेच फोटो, आधार कार्डचे फोटो डिलीट करत असतो. मम्मीच्या मोबाईलवर नाही आले तर माझ्याच मोबाईलवर येत असते. लई साऱ्या एजंटचे नंबर आहे माझ्याकडे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर