ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

शिवराज मोटेगावकरने स्पेशल बॅचच्या 150 विद्यार्थ्यांना गेस पेपर दिला:ठराविक विद्यार्थ्यांना 580 पेक्षा अधिक गुण दाखवल्याची माहितीही उघडकीस

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरसीसी क्लासेसमध्ये सराव परीक्षेत ठराविक विद्यार्थ्यांना ५८० पेक्षा जास्त गुण दाखवले जायचे. त्यानंतर या विद्यार्थ्यांची एक वेगळी ‘स्पेशल बॅच’ बनवण्यात आली. या ‘एम्स टॉपर’ नावाच्या स्वतंत्र बॅचमधील १५० हून अधिक विद्यार्थ्यांना ‘गेस पेपर’ पुरवल्याचा संशय सीबीआयला आहे. विद्यार्थ्यांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. सीबीआयचे तपास पथक सध्या लातुरात ठाण मांडून आहे. आतापर्यंत ज्यांची चौकशी झाली, ते सर्व विद्यार्थी मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसशी जोडलेले असल्याचे उघड झाले आहे. या स्पेशल बॅचमधील मुलांना नीट परीक्षेतील संभाव्य प्रश्न उपलब्ध करून दिले होते का, याचा शोध सुरू आहे. सीबीआयच्या पथकाने लातूरसह अंबाजोगाई, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देत चौकशीची प्रक्रिया पूर्ण केली. पीएमओचा हस्तक्षेप नीट-यूजी पेपर लीक प्रकरणामुळे २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) सांभाळणार आहे. पेपर सेट करण्यापासून ते परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी लष्कराची मदत घेतली जाऊ शकते. गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. रफ नोट्स व गेस पेपर ठरणार मुख्य पुरावे संचालक मोटेगावकर याला अटक केल्यानंतर तपासाला वेग आला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे ‘मोटेगावकर यांनी किती पैसे घेतले?’, ‘परीक्षेच्या आदल्या दिवशी नेमके कोणते प्रश्न दिले?’ अशी विचारणा केली. केवळ विचारपूस न करता, क्लासेसमध्ये देण्यात आलेले गेस पेपर, सराव परीक्षेच्या काही निवडक प्रश्नपत्रिका आणि मुलांनी आपल्या वहीत लिहून काढलेले संभाव्य प्रश्न सीबीआयने जप्त केले. हेच रफ नोट्स,पेपर आता या आर्थिक गैरव्यवहाराचे व पेपरफुटीचे मुख्य पुरावे ठरतील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर