ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

..म्हणून विरोधी पक्षनेता नेमला जात नाही:राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, रेवडी वाटून निवडणूक जिंकण्याचा खेळ- विजय वडेट्टीवार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विरोधी पक्षनेते पदासाठी कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे असायला हवा. उपमुख्यमंत्री पद हे देखील घटनात्मक पद नाही ते दोन नेमले जातात. पण घटनेत तरतूद असलेले विरोधी पक्षनेता हे पद रिकामे ठेवता यावर संशोधन करण्याची गरज काय? महाराष्ट्र लुटण्यासाठी अडचण ठरु नये म्हणून विरोधी पक्षनेता निवडला जावू नये ही सरकारची भूमिका असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. चंद्रपूरमधील आमच्या काही नगरसेवकांना चाकू, तलवार, बंदूक यांचा धाक दाखवत शिवीगाळ करण्यात आली त्यांना पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या व्यक्तीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो धानोरकर यांच्या गटाचा पराभूत उमेदवार आहे असे मी ऐकले आहे, नेमके या प्रकरणी संपूर्ण माहिती नाही, गुन्हेगार कोण आहेत, कुणाच्या जवळचे आहेत याबद्दल मला माहिती नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे विजय वडेट्टीवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावे का नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला वाटते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अजित पवार आता नाहीत अशा परिस्थितीत कुठल्याही पक्षाची ताकद एकवटली पाहिजे. जनतेला त्या पक्षाकडून काही अपेक्षा आहेत, त्यांच्या विचारधारेशी अनेक लोकं जोडले गेले आहेत ते जोपासण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे असे मला वाटते. पण तो त्यांचा प्रश्न आहे की कसे एकत्र यायचे आणि कुठल्या प्रश्नावर एकत्र यायचे. शरद पवार यांनी कुटुंबाला एका माळेत बांधण्याचे काम केले आहे. ही जबाबदारी आता युवा पिढीने एकत्र सांभाळली पाहिजे. सुनेत्रा पवारांना मंत्रिपद दिले तरच चांगलेच विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना जर उपमुख्यमंत्री करायचे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे असेही एक मंत्रिपद राखीव आहेच. एक महिला जर उपमुख्यमंत्री होत असेत तर पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री मिळेल याचा आम्हालाही आनंदच आहे. त्यांना पद दिले तर चांगलीच गोष्ट होईल. राज्य दिवाळखोरीत निघाले विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य दिवाळखोरीत निघाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी रेवडी वाटल्या जात आहेत. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती न बघता केवळ सत्ता मिळवण्यासाठी राज्याचे वाटोळे करण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे निर्णय होतात आणि निवडणूक जिंकल्या जातात यावेळी निवडणूक आयोग काय करते असा सवालही त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली पाहिजे पण ते कठोर भूमिका घेऊ शकत नाहीत. ते सरकारच्या हातामधील खेळणं झाले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर