ब्रेकिंग न्यूज
⚡ Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या घरी दरोडा? बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् सत्य समोर आल्यावर सगळ्यांना बस… ✦ ⚡ ठाणे हादरलं! भाड्याच्या वादातून रिक्षाचालकाला संपवलं, नातेवाईकांच्या आरोपाने खळबळ ✦ ⚡ महिलांसाठी सुवर्णसंधी! 45 दिवसांचं मोफत प्रशिक्षण घ्या आणि हातमागावर बनवा पैठणी, फायद्याची योजना काय? Video… ✦ ⚡ Pandharpur: ‘5 मिनिटं थांबलो असतो तर माझाही जीव…’ विहीर दुर्घटनेतून कसा वाचला 16 वर्षांचा शुभम, सांगितला… ✦ ⚡ दिवाळीला मुलगी घरी आलेली, आईच्या फोनवर व्हिडिओ कॉल, पण संशय बळावला अन् अनर्थ टळला, नाशिकात खळबळ ✦ ⚡ पारंपरिक शेतीची वाट सोडली, बोर लागवडीचा केला यशस्वी प्रयोग, वर्षाला निव्वळ 6 लाख नफा, Video ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका!
SP News Maregaon

महिलांसाठी सुवर्णसंधी! 45 दिवसांचं मोफत प्रशिक्षण घ्या आणि हातमागावर बनवा पैठणी, फायद्याची योजना काय? Video…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर : पैठणी विणकामाची पारंपरिक कला जपण्यासोबतच महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी मुकुंदनगर येथील सहयोग हँडलूम सेंटरमध्ये विशेष प्रशिक्षण उपक्रम राबवला जात आहे. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विणकर सेवा केंद्राच्या माध्यमातून समर्थ योजनेंतर्गत महिलांना 45 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामुळे महिलांना पारंपरिक विणकाम शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.

या प्रशिक्षणात महिलांना हातमागावर पैठणी विणण्याचे प्रत्यक्ष धडे दिले जात आहेत. प्रशिक्षणासाठी सुरुवातीला महिलांची 30 जणांची बॅच तयार केली जाते. विशेष म्हणजे, प्रशिक्षणाच्या प्रत्येक दिवशी महिलांना 300 रुपये भत्ता दिला जातो, ज्यामुळे प्रशिक्षण घेत असतानाच त्यांना आर्थिक मदतही मिळते. प्रशिक्षणादरम्यान सूत कातणे, हातमागाची जोडणी, पैठणीतील विविध डिझाइन, रंगसंगती आणि प्रत्यक्ष विणकामाचे तांत्रिक ज्ञान दिले जात आहे. हातमागावरील पैठणी विणण्याची कला पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा देखील यामागील प्रमुख उद्देश आहे.

30 हजारांचा खर्च आणि 3 लाखांची कमाई, हिरव्या वांग्यानं कमाल केली, सोलापूरचा शेतकरी मालामाल

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना भारत सरकारचे अधिकृत प्रमाणपत्र आणि हातमाग कामगार म्हणून ओळखपत्र दिले जाते. यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होते. तसेच स्वतःचा हातमाग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमामुळे महिलांना रोजगाराचा नवा मार्ग उपलब्ध होत असून महाराष्ट्राची पारंपरिक पैठणी विणकामाची कला जिवंत ठेवण्यास मदत होत आहे.

पूर्वी मी एक साधी गृहिणी होते आणि आता मी या प्रशिक्षणामुळे स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे, असे विचार विणकार उमा भंडारे यांनी व्यक्त केले आहेत. प्रशिक्षण घेतल्यापासूनच मला पैसे मिळत असून, आता मी त्याच सेंटरमध्ये नोकरी करत असल्याचा मला खूप आनंद होत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर