ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

सालई पोड (खंडणी)येथील शेतकऱ्यांचा गोठ्यावर वीज पडून दोन बैलाचा मृत्यू .

357 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दोन मजुराला विजेचा धक्का शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट

सुमारे एक लाख पंधरा हजाराचे शेतकऱ्यांचे नुकसान.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव:-तालुक्यातील सालई पोड (खंडणी) गावा जवळील शेतशिवारात टोबनी चे काम करत असतांना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास लक्ष्मण चंडकु टेकाम वय सुमारे 55 वर्ष रा. सालई पोड (खंडणी) येथील शेतकऱ्यांचा शेतातील गोठ्या मध्ये 2 बैल बांधलेले होते.व पाऊस जोरात सुरु असल्या मुळे काही मजुर त्या ठिकाणी गेले होते.

अचानक विजेचा कडकडाट सुरु झाला व काही वेळातच विज कोसळली त्या मुळे गोठ्यातील दोन बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला तर 2 महिला मजुराला विजेचा धक्का बसल्याची घटना सालई पोड (खंडणी) येथील गावा जवळील शेतात घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की.
लक्ष्मण चंडकु टेकाम वय सुमारे 55 वर्ष रा. सालई पोड (खंडणी) यांचे कडे 3 एकर शेत सालई पोड (खंडणी) गावाला लागून आहे आज दिनांक 15 जुन 2022 रोज बुधवारला गावा लगतच्या शेतामध्ये टोबणीचे काम सुरु होते.दुपारी 3 वाजता सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरु झाला  त्या मुळे लक्ष्मण टेकाम व शेतातील मजुर आसऱ्या साठी शेतातील गोठ्या मध्ये गेले.

काही वेळा आधीच त्याच गोठ्या मध्ये त्यांचे 2 बैल बांधालेले होते. पाऊस सुरु होताच शेतकरी व शेतमजूर गोठ्यात थांबले होते.काही वेळातच विज पडून दोन बैलाचा मृत्यू झाला तर 2 महिलाना वीजेचा धक्का बसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच खंडणी येथील तलाठी काही वेळातच घटना स्थळी दाखल झाले. आणि घटनेचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर