ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

28 वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या

112 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतात कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन

गजानन आसुटकर मारेगाव,

शेतामध्ये कीटकनाशक प्राशन करून एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सिंधी येथे घडली.राहुल गोविंदा काळे वय 30 असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील सिंधी येथील राहिवासी होता.

राहुल यांच्या वडिलांच्या नावाने 6 एकर शेती असल्याची माहिती आहे. राहुल हा वडिलांना त्यांच्या शेतीच्या कामामध्ये मदत करीत होता. त्याने दिनांक 2 मे 2024 रोज गुरुवारला दुपारच्या सुमारास शेतामध्ये  कीटकनाशक प्राशन केले.कुटुंबियांनाही बाब सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान लक्षात आली.

त्यांनी लगेच मारेगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली.पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.
मृतक राहुल यांचे पश्चात वडील,भाऊ,वहिनी, पुतण्या,पुतणी असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहिपर्यंत मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गर्शनाखाली जमादार राजू टेकाम करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर