ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पाटण – झरी मार्ग तात्काळ  दुरुस्त करा.

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

युवाकाँग्रेसची सा.बां. विभागाकडे मागणी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामनी तालुक्यातील
पाटण ते झरी मार्गाची गत एक वर्षापासून दुरवस्था झाली आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा युवक काँग्रेसच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग पांडरकवडा येथील कार्यकारी अभियंत्यांना
निवेदनातून दिला आहे.

या मार्गावर दुचाकी अपघातात अनेक झन गंभीर जखमी झाले. पाटण व परिसरातील 35 ते 40 गावातील शेकडो जनता दुचाकी व इतर वाहनाने शासकीय कामानिमित्त याच मार्गाने झरीला येतात गेल्या वर्षी पासून यामार्गाची दुरावस्था बिकट झाली आहे .खड्डे पडल्याने चारचाकी व दुचाकी वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे.

परंतु सदर रस्ता अतिशय खराब असल्याने सायकलही घेऊन जाणे कठीण व धोक्याचे झाले आहे. पाटण ते झरी 8 कि.मी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यात खड्डे की रस्ता खड्यात अशी अवस्था झालेली आहे.सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्यात यावे. अशी मागणी युवा काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग पांडरकवडा येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदनातून दिला आहे.


निवेदन देतेवेळी सरपंच नीलेश येल्टीवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल दांडेकर, मिथून सोयाम, गंगाधर आत्राम, नितीन खडसे, आसिफ कुरेशी, राकेश गालेवार, प्रतीक गंद्रतवार, शंकर आकुलवार, ओंकार नागरतवार, मुकेश शिरपूरकर, निखिल चौधरी, श्रीकांत अनमूलवार व चेतन मॅकलवार इ. उपस्थित होते .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर