ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकात घुगूल यांच्या प्रयत्नाला यश.

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तीन वर्षापासून रखडलेले  डोंगरगाव ते सिंधीवाढोणा रस्त्याचे  काम परत झाले आहे सुरु

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत डोंगरगाव सिंधी वाढोणा ५  कि.मी.  रस्त्याचे   पुलासहित  पुलासहि  कामाला मंजुरी देण्यात आली होती . कामाला सुरूवात   करण्यात आली परंतु उपलब्ध निधी कमी पडल्याने  गेल्या तीन वर्षापासून डोंगरगाव ते सिंदीवाढोना या रस्त्या चे काम बंद झाले होते. या तीन वर्षात प्रचंड त्रास डोंगरगाव येथे ग्रामवसी यांना करावा लागला आणि रस्त्यावर गीट्टी टाकून असल्या ने अनेक अपघात देखील झाले.

ही बाब लक्षात घेताच ग्रामस्थांनी शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल यांच मार्गदर्शन घेतले  .  चंद्रकांत घुगुल यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन दिनांक २६ /०४/२०२२ रोजी कार्यकारी अभियंता यांना रखडलेले रस्त्याचे  काम पुन्हा सुरु करण्यात यावे यासाठी यवतमाळ यांना निवेदन दिले.या निवेदनाची दाखल घेत कार्यकारी अभियंता तोडे साहेब त्यांचे सहकारी नागरे साहेब व नारिंगे यांनी दिनांक २८/०४/२०२२ रोजी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली लवरच कामाला सुरुवात केली.

कामाला सुरुवात झालेली पाहून  डोंगरगाव येथील रमेश जिवतोडे,वासुदेव देठे,तुकाराम नवले,रामदास चार्लेकर,गोपीचंद निखाडे,तेजस झाडे,सुरज कष्टी,सुधाकर नांदेकर,विश्वास बल्की,गणेश चार्लेकर,किशोर क्षिरसागर,मंगेश कोहळे,भालचंद्र कोसारकर,अनिल नांदेकर,बबन ताकसांडे.विजय नवले,वामन कष्टी,किरण बोरकर,आणि समस्त  ग्रामसथांनी शिवसेना चंद्रकांत घुगुल यांचे आभार मानले .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर