ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

झरी  तालुका पत्रकार  संघटनेच्या नृत्य स्पर्धेला  उत्स्फूर्त  प्रतिसाद

61 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

•  हींदी , मराठी तेलगु व विविध गाण्यावर केले नृत्य
•  १३ – ४० वर्षे वयाच्या स्पर्धकांनी दाखविला उत्साह

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये शाळा , महाविद्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणी सास्कृतिक कार्यक्रम घेता आले नाही . त्यामुळे त्याकाळात कलाकारांना सुप्त गुणांना संधी करिता  व्यासपीठ उपलब्ध होऊ शकले नाही . त्या जाणीवेतून  तालुक्यातील व इतर भागातील  कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता तसेच ज्याला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजले जाते त्या पत्रकारांशी जनतेशी आणखी संवाद वाढवा  आनंद आणि मनोरंजन या सर्व हेतूने
झरी जामणी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनी  सांयंकाळी ७ वाजता बालाजी मंदिर सभागृह ,  पाटण  येथे  नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी   बोदकुरवार अध्यक्ष व माजी आमदार वामनराव कासावार प्रमुख पाहुणे राम आईटवार,प्रकाश कासावार ,देवन्ना भांडारवार  तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
या  स्पर्धेत तालुक्यातील भेंडाळा , खापरी मार्की खु . पाटण  तसेच वणी ‘ पांढरकवडा मारेगाव येथील २५ स्पर्धकानी सहभाग घेतला होता .

प्रथम पारितोषिक मिताली पांडे वणी ,द्वितीय पारितोषिक पवनी चंदावार ,तृतीय पारितोषिक   मिलिंद अँड गृप  पांढरकवडा , चतुर्थ पारितोषिक
पूजा ठाकुर,यांनी पटकावला असून साहिल शेख पाटण ,रोहित बोरकर व  जीविका चौधरी  यांना   संघटने कडून प्रोस्ताहनपर  पारितोषिक देण्यात आले.तसेच सहभाग  घेणाऱ्या  स्पर्धकांना .  सन्मान चिन्ह  व प्रमाणपत्र देण्यात आले .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पाईलवार सर बंडूभाऊ सोयाम, संजय निंदेकर , ज्ञानेश्वर आवारी , रमेश अंगलवार , विजय मेगणवार , नागेश अक्केवार , संजय आक्कीनवार , अनिल कुंटावार , निलेश भोयर , अजय कोवे व  रफिक कनोजे परिश्रम घेतले होते . या कार्यक्रमाच्या शेवट पर्यंत  प्रेक्षकांची गर्दी कायम टिकून होती .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर