ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगाव येथे अल्पवयीन विदयार्थिनीचा विनयभंग.

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,संशयित आरोपीस अटक

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव येथून खासगी वर्ग आटोपून आपल्या गावाला जात असलेल्या एका शाळकरी मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना आज दिनांक 16 जुन 2022 रोज गुरुवारला सकाळी 10:30 सुमारास घडली. सदर मुलीने घरी जाऊन आपबीती आपल्या वडिलांना सांगितल्यावर घरच्यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संशयित आरोपीस अटक केली आहे. 

टाकळखेडा येथील एक मुलगी मारेगाव येथे शिक्षण घेत आहे. नेहमी प्रमाणे ती आज दिनांक 16 जुन 2022 रोज गुरुवारला सकाळी खासगी वर्गासाठी मारेगाव येथे आली होती. वर्ग आटोपून ती आपल्या गावाला सायकलने घरी परत जात असतांना मारेगाव जवळील घोंसा मार्गावरील आय टी आय जवळ संशयित आरोपी हर्षल धंदरे वय सुमारे 23 वर्ष रा. मांगरुळ हा त्याच्या दुचाकीने आला. व त्याने या मुलीचा वाईट उद्देशाने उजवा हात पकडून मला तुझ्याशी बोलायचे आहे.

असे म्हणत विनयभंग केला. तसेच मोबाईल नंबरची मागणी सुध्दा केली. पीडिता घरी गेल्यावर तिने आपल्या कुटुंबियांना आपबीती सांगितली. घरच्यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.तक्रारीवरुन मारेगाव पोलिसांनी कलम 354 भादवी (पोक्सो )अंतर्गत गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि.डी.जी.सावंत करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर