ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

नरसाळा येथील 28 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेवुन आत्महत्या.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नरसाळा येथील घटणा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.

आज दिनांक 27ऑगस्ट 2022 रोज शनिवारला सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास नरसाळा येथील गजानन नारायण मुसळे वय सुमारे 28 वर्ष हा नेहमी प्रमाणे नरसाळा येथील शेतशिवारात जनावरे चरायला गेला होता व एका शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहिती नुसार गजानन नारायण मुसळे वय सुमारे 28 वर्षे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो शेती करायचा व त्याच्या वडिलांच्या नावाने 8 एकर शेती नरसाळा व म्हेसदोडका येथे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तो शेती करून आपला कुटुंबाचा उद्धार निर्वाह करायचा गजनान यांचे लग्न काही वर्षा आधी झाले होते.पण लग्नाच्या 3 दिवसात त्यांची पत्नी त्याला सोडुन गेल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

या घटनेची माहिती मारेगाव मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून त्याला उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.त्यांचे मागे आई, वडील, एक लहान भाऊ,असा आप्त परिवार आहे.त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही.पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार किसन संकुलवार करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर