ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विविध मागण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे चक्काजामचे आयोजन

100 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव:- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मारेगाव येथे दिनांक 6 नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.तशा प्रकारचे निवेदन त्यांनी मारेगाव तहसीलदार यांना आज दिले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या.यात कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, सोयाबीनला प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमीभाव जाहीर करावा,नादुरुस्त,बिघाड व वारंवार वीज खंडित करणारे रोहित्र ताबडतोब दुरुस्त करून देण्यात यावे,शेतकऱ्यांच्या शेत पंपाला दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्यात यावा,

अतिवृष्टी अनुदान तात्काळ देण्यात यावे,निराधारांना तात्काळ मानधन देण्यात यावे,केंद्र शासनाने केलेला आयात करार रद्द करावा, पीक विम्याची अग्रीम रक्कम २५ टक्के दिवाळीपूर्वी देण्यात यावी या आणि इतर मागण्यांसाठी दि.6 नोव्हेंबरला सोमवारी मारेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.तशा प्रकारचे निवेदन शिवसेना मारेगाव तालुका अध्यक्ष संजय आवारी यांचे नेतृत्वात देण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष मनीष मस्की,युवासेना तालुका अध्यक्ष मयूर ठाकरे,शहराध्यक्ष गणेश आसुटकर, मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जीवन काळे, किसन मत्ते,रामकृष्ण खंडी,अमोल झोटिंग,मनोज वादाफळे, दिगंबर नावडे,शुभम लालसरे,गुरुदास घोटेकर,ब्रह्मदेव जुनगरी,चंद्रशेखर थेरे,दुमदेव बेलेकर,अभय चौधरी, राजू मोरेगोविंदा निखाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर