ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

तालुका विधी सेवा समीती दिवाणी व फौजदारी न्यायालय झरीजामणी तर्फे

104 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कायदेशीर जागृतीद्वारे महिलांचे सक्षमीकरण शिबीर.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- भारतरत्न आणी नोबल शांतता पुरस्कार मदर टेरेसा यांचे जन्म दिवसाचे औचित्याने तालुका विधी सेवा समिती झरी जामणी तर्फे पंचायत समिती कार्यालय झरी जामणी चे सभागृहात दि.२६.०८.२२ रोजी कायदेशीर जागृतीद्वारे महिलांचे सक्षमीकरण शिबीराचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश बी.एस.वाढई प्रमुख पाहुणे म्हणून रविकुमार सांगळे गटविकास अधिकारी पंचायत समिती झरी व संगीता हेलोंडे ठाणेदार पोलीस स्टेशन पाटण तसेच सहाय्यक सरकारी वकील पी.डी.कपुर,बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड डी.व्ही.काटकर, अँड व्ही.आर.मदीकुंटावार, अँड आर.व्ही.भोयर,अँड आर.एम.बोथले, एकात्मिक विकास अधिकारी सुचिता भगत हजर होते.

कार्यक्रमात अध्यक्ष श्री वाढई साहेब यांनी महीलांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाची भुमिका आणी कार्ये महीलांकरीता संविधानात असलेली तरतुद व भादविचे कलम ३०९ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे हेलोंडे मँडम महीलांना कायद्याने दिलेले अधिकार तसेच पोलीसांचे कर्तव्ये याबाबत सांगितले अँड काटकर यांनी अश्लीलता,हुंडाबळी,अँसिड हमला,स्रियांचा सन्मानाचा अपमान, अपहरण,बलात्कार आणी लैंगिक अत्याचार, कौंटुबीक हिंसाचार व बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

अँड मदीकुंटावार यांनी कौंटुबीक कायदा,कामगार कायदे,लग्न व घटस्फोट, खावटी,महिला व मालमत्तेचा अधिकार,कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायदा २०१३, कारखाना कायदा, समान मोबादला कायदा १९४८ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अँड भोयर यांनी मोफत कायदेशीर सहाय्य व सेवा, महिलांना अटकेबाबत असलेले सरंक्षण व अधिकार,दखलपात्र गुन्हा व अदखलपात्र गुन्हा,अटक वारंट,अटक व्यक्तीला जमानतीचे अधिकार कायदेशीर चर्चा, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. गटविकास अधिकारी सांगळे यांनी महीलांना असलेले शासकीय योजने बाबत माहिती सांगितली.

कार्यक्रमाला तालुक्यातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,बचत गट महिला व न्यायालयीन कर्मचारी श्री.दातारकर, श्री.मेश्राम, श्री. राळे,श्री जुनघरे,तसेच प्रकाश बेरेवार हजर होते कार्यक्रमाचे संचालन श्री कांबळे तर आभार प्रदर्शन अँड बोथले यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर