ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

केगावच्या मातीतील जिद्दीचा विजय!

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

एकाच घरातील भाऊ-बहिण पोलीस भरतीत झळकले

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील केगाव या छोट्याशा गावाने जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची एक प्रेरणादायी कहाणी घडवली आहे. शेतकरी कुटुंबातील दुर्गे परिवारातील भाऊ-बहिण—अमित राजेश दुर्गे आणि आचल राजेश दुर्गे—यांनी नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत दणदणीत यश मिळवत थेट पोलीस खात्यात स्थान पटकावले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील ही दोन्ही लेकरं आज केवळ कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण गावाचा अभिमान ठरली आहेत.

गरिबी, मर्यादित साधनसामग्री आणि कठीण परिस्थिती यांना न जुमानता या दोघांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाचा शिखर गाठला. केगाव ते वेगाव असा दररोज सुमारे दोन किलोमीटरचा पायी प्रवास करत त्यांनी श्री जगन्नाथ महाराज विद्यालयात ५ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उन्हातान्हात, पावसातही न खचता चाललेला हा संघर्षमय प्रवासच त्यांच्या यशाचा भक्कम पाया ठरला.


शालेय शिक्षणानंतर त्यांनी थेट पोलीस भरतीच्या मैदानात उडी घेतली आणि तिथेही आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवत बाजी मारली. अमित दुर्गे यांची नागपूर येथे तर आचल दुर्गे यांची वर्धा येथे पोलीस विभागात निवड झाली आहे. शेतकऱ्याच्या घरातून एकाच वेळी मुलगा आणि मुलगी पोलीस दलात दाखल होणे, ही केगावसाठी अभिमानाची ऐतिहासिक घटना ठरली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल श्री जगन्नाथ महाराज विद्यालय, वेगाव येथे मुख्याध्यापक नरेश वाघमारे आणि ज्येष्ठ शिक्षक माधव कोहळे यांच्या हस्ते या दोन्ही भावंडांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल पेचे, नरेंद्र खोके, पंकज राठोड, सतीश गौरकर, प्रशांत देरकर, कु. कलावती कुडमेथे, सागर कडू आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

दुर्गे भावंडांची ही यशोगाथा आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे. “जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही,” हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशामुळे केगावसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून गावागावातून त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक होत आहे. शेतकऱ्याच्या मुलगा व मुलगी पोलीस झाल्याने गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरून आला आहे.

खरंच… ही केवळ बातमी नाही, तर संघर्षातून उभी राहिलेली यशाची जिवंत प्रेरणागाथा आहे!

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर