ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बाळापूर येथिल शेतकऱ्याची आत्महत्या

123 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विषारी किटकनाशक प्राशन केल्याने,उपचारादरम्यान मृत्यू

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

बाळापूर (बोपापूर) येथिल शेतकरी त्यात्या वामन ढेंगळे (वय ५७ )यांनी शुक्रवार दि.१९ जुलै रोजी विषारी कीटकनाशक प्राशन केले  असता उपचारासाठी वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु दि. २३ जूलै  मंगळवार रोजी सायंकाळी  ७ वा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .

बाळापूर येथील शेतकरी तात्या ढेंगळे याने १९ जुलै रोजी दुपारी  दरम्यान आपल्या घरातच कीटकनाशक प्राशन केले होते.त्याच्या तोंडातून फेस निघत असल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांनी तात्काळ वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.मागील ४ दिवसांपासून उपचार सुरु असताना २३ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दिनांक २४ बुधवारला त्यांचे राहते गावी अंत्यसंस्कार करण्यात आले .

मृतक तात्या ढेंगळे  यांचे कडे साडेचार एकर शेती असून यांच्यावर यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे एक लाख रुपये तसेच इतर खाजगी सावकाराचे कर्ज असल्याचे जवळील नातेवाईकाकडून सांगण्यात आले आहे. सततची नापिकी तसेच उदरनिर्वाहाचा प्रश्न सतावत असल्यामुळे तात्या ढेंगळे यांनी आत्महत्या सारखा टोकाचा पाऊल उचलल्याचे बोलल्या जाते. मृतक याच्यामागे पत्नी, एक मुलगा व दोन विवाहित मुली असा आप्तपरिवार असून शासनाने त्याच्या कुटुंबीयांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर