ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

भरधाव ट्रॅव्हल्सची उभ्या टिप्परला भिषण धडक,5 प्रवासी गंभीर जखमी तर 45 किरकोळ जखमी.

136 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव ते वणी राज्य महामार्गावरील गौराळा बस स्टॉप जवळील घटणा.

तालुका प्रतिनिधी मारेगाव:- गजानन आसुटकर ,

मारेगांव तालुक्यातील गौराळा बस स्टॉप जवळ राज्य महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सची उभ्या टिप्परला मागुन भिषण धडक दिली असुन या अपघातात ट्रॅव्हल्स मधील अनेक जन गंभीर जखमी झाले आहे.ही घटना आज दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोज गुरुवारला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास घडली.

असुन गौराळा बस स्टॉप जवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेला टिप्परला अकोला येथून चिमूर कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक MH. 27 A.9994 ने जबर मागुन धडक दिली.ट्रॅव्हल्स मध्ये सुमारे 50 प्रवासी होते यातील 5 गंभीर जखमी झाले तर 45 प्रवासी किरकोळ जखमी झाले.ट्रॅव्हल्स कॅबिनमध्ये एक महिला फसलेल्या आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

ही घटणा आज दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोज गुरुवारला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असुन ही ट्रॅव्हल्स अकोला येथील असून या ट्रॅव्हल्समधील प्रवासी हे तेल्हारा तालुक्यातील अकोली (रूपराव)येथील रहिवासी आहे ते ट्रॅव्हल्स भाड्याने करून चिमूर येथे जात होते.सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी घटनेची माहिती लगेच मारेगांव पोलिसांना दिली.

माहिती मिळताच मारेगाव व वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी व्यक्तीला मारेगांव येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर व यवतमाळ येथे स्थलांतरीत केल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर