ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आकापुर येथे कबड्डीचे खुले सामने

225 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जय शिवराय क्रीडा मंडळ तथा आकापुर ग्रामवासी यांचे आयोजन

प्रथम पुरस्कार 30 हजार द्वितीय 20 हजार,तृतीय 10 हजार तर चतुर्थ 7 हजार रुपये

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील आकापुर येथे कबड्डीच्या खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 7 जानेवारी 2024 पासून या सामान्यांना सुरवात होणार असून या सामन्यामध्ये बक्षिसांची मोठ्या प्रमाणात लय लुट करण्यात येणार आहे.आकापुर येथील जि.प.शाळेच्या भव्य पटांगणावर कबड्डीचे खुले सामने रंगणार आहे.

दि.7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन गौरीशंकर खुराणा, अध्यक्ष,जनहित कल्याण संघटना मारेगाव हे करणार असुन या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन आशिषभाऊ कुलसंगे अध्यक्ष, वसंत जिनिंग वणी,प्रमुख पाहुणे म्हणून संदिप कारेकार सरपंच, रविंद्र वाढई पोलीस पाटील आकापुर,उपस्थीत राहणार आहे.

या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार जनहित कल्याण संघटना मारेगाव यांचे तर्फे 30,000-/ रुपये असुन द्वितीय जय शिवराय क्रीडा मंडळ आकापुर यांचे वतीने 20,000-/ रुपयाचे आहे.तर तृतिय पुरस्कार मेक्यानिकल लाईन वणी यांचे तर्फे तर
चतुर्थ पुरस्कार बंडू पा. देऊळकर (माजी पोलीस पाटील) आकापुर 7,000-/ रुपये यांचे वतीने ठेवण्यात आले आहे.

तसेच अंतीम सामन्यासाठी बेस्ट रेडर,बेस्ट डिफेन्डर यांना सुध्दा 1000/- रूपयाचे बक्षिस असुन बेस्ट रेडर साठी1000/- रूपये तर बेस्ट डिफेन्डर साठी 1000/- रूपये ठेवण्यात आले आहे.

या सामन्यासाठी प्रवेश फी.1001/-रूपये असुन लेट फी.1500/- रू तसेच तक्रार फी.2000/- रूपये ठेवण्यात आली आहे. तालुक्यातील तसेच परिसरातील कबड्डी खेळ चाहत्यांनी कबड्डी खेळणाऱ्या संघांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन जय शिवराय क्रीडा मंडळ आकापुर ता.मारेगांव, जि. यवतमाळ यांचे वतीने करण्यात आले आहे.
संपर्क 8766774574,9834287354,
7775828609

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर