ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कंत्राटी शिक्षण सेवक भरती सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य द्या

142 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुशिक्षित बेरोजगारांचे गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

सुरेश पाचभाई मारेगाव,

कंत्राटी शिक्षण सेवक भरती सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य द्या अशा प्रकारचे निवेदन तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी गटशिक्षणाधिकारी मारेगाव यांना दिले आहे.

पेसा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेले रिक्त पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे पत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.यात सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याचे नमूद आहे. सध्या सगळीकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत.शिक्षण पदविका घेतलेले बी.ए.,एम.ए.आणि बी.एड.,डी.एड. झालेले अनेक विद्यार्थी अनेक गावांमध्ये आहेत.

त्यांना वाऱ्यावर सोडून निवृत्त शिक्षकांना घेण्याचे पत्र प्रसिद्ध झाल्याने अनेकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना घेऊन सुशिक्षित बेरोजगारांना वंचित ठेवण्यात येऊ नये.तसेच ही भरती प्रक्रिया शाळा तसेच ग्रामपंचायत स्तरावर न घेता पंचायत समिती स्तरावर घ्यावी जेणेकरून प्राधान्य क्रम देताना योग्य व्यक्तीला न्याय मिळेल अशी अपेक्षा सुद्धा या सुशिक्षित बेरोजगारांनी व्यक्त केलेली आहे.

मागच्या वर्षी जे कंत्राटी शिक्षण सेवक होते त्यांनाच पुन्हा संधी न देता ही प्रक्रिया नव्याने राबविण्यात यावी अशी सुद्धा या निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे.यावेळी आशिष भास्कर पिंपळकर,सुधीर रमेश कळसकर,गजानन लक्ष्मण झाडे,अजय निळकंठ पाल,निखिल अरुण गेडाम,विनोद वसंता वासाडे आणि  पवन भास्कर भोयर उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर