ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मारेगांव येथील पोलीस वेलफेअर पेट्रोलपंपाचे उद्घाटन संपन्न.

56 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी केले उद्घाटन.

आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार यांचीही उपस्थिती.

सुरेश पाचभाई मारेगाव :- येथील मागील अनेक दिवसांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस स्टेशन समोरील भारत पेट्रोलियमचे पेट्रोलपंपचे उदघाटन अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते आज दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोज गुरुवारला करण्यात आले. यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार अध्यक्षस्थानी होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार,उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळेकर,तहसीलदार दीपक पुंडे,नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की ,बी.पी.सी.एल.चे क्वॉडीनेटर गजेंद्र कुशवाह यांची उपस्थिती होती.उद्घाटनवेळी बोलतांना अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे म्हणाले की मारेगावचे पेट्रोलपंप चालवितांना पारदर्शकता राहील.पेट्रोलपंपची उपलब्धताच पोलीस व भारत पेट्रोलपंप सहकार्यातून उभारण्यात आली.

पोलिस वेलफेअर कडून 24 तास चालणाऱ्या पेट्रोल डिझेल पंप व यातून मिळणाऱ्या उत्पादनातून पोलिस वेलफेअरच्या कर्मचाऱ्यांना मदत मिळेल.यावेळी आमदार बोदकूरवार यांनी पोलीस विभागाने गाळेचा प्रश्न मार्गी लावून तालुक्यांतील बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची भूमिका मांडली असुन कार्यक्रमाचे प्रस्तावित गजेंद्र कुशवाह ,सूत्रसंचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले तर ठाणेदार राजेश पुरी यांनी आभार मानले.यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर