ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मार्डी येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

आदर्श कला उच्च माध्यमिक विद्यालय मार्डी येथील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श कॉलेजचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य रमेश ढुमणे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्याध्यापक भास्कर धानफुले,सरपंच रविराज चंदनखेडे,प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रशांत पाटील प्रा. सुरेश नाखले प्रा. भास्कर राऊत उपस्थित होते.

बारावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले यश मिळावे यासाठी मान्यवरांनी,प्रमुख पाहुण्यांनी,मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांमधून मीनल मांढरे, मीनाली इरदंडे, प्रतीक्षा झाडे, सुहानी मांढरे, अनुश्री शिवरकर, वृषाली निवल,चंद्रकांत वानखडे, विशाल मटे,कुशल ढुमणे,गोपाल मोरे,जया नान्हे, रमजान पठाण,कार्तिक कळस्कर,अभिजीत चौधरी, गायत्री इरदंडे,समीक्षा कुमरे,कोमल सालुरकर,सुलोचना मेश्राम,आरती देवाळकर याही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करीत असतांना अनेकांनी अश्रुना मोकळी वाट करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली कुमरे, प्रास्ताविक  आचल लिहीतकर तर आभार श्रुती हिने मानले. कार्यक्रमाला वर्ग 11  व 12 वीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर