ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

महापुरुषांच्या विचारानेच समाजाची प्रगती शक्य – व्याख्याते सुधाकर इंगोले

5 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चनोडा येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा

संपादक इंजिनीयर सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: “छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी स्वराज्याची निर्मिती केली. अशा या लोककल्याणकारी राजाचे विचार सर्वांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. महिलांनी जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकार्यात पुढे यावे, कारण महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच समाजाची खरी प्रगती शक्य आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते सुधाकर इंगोले यांनी केले.

चनोडा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. १९ फेब्रुवारी रोजी चनोडा येथील ग्रामस्थांच्या वतीने या सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. स्थानिक जिल्हा परिषद शाळेसमोरील प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवश्री दत्ताभाऊ डोये, ज्येष्ठ पत्रकार माणिक कांबळे, देवानंद काकडे, मार्डी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक मोरेश्वर काकडे, रवींद्र पाचभाई, उमाकांत बदकी आणि सुरेंद्र काकडे यांची विचारमंचावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना दत्ताभाऊ डोये व माणिक कांबळे यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पाचभाई यांनी केले, सूत्रसंचालन निखिल काकडे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल बदकी यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कुणाल वाटेकर, मोहन अहिरकर, अमित काकडे, दादू ढोके, लोकेश काकडे, शुभम दर्वे,

अक्षय ढोके, ज्ञानेश्वर काकडे, समीर सातपुते, तेजस काकडे, सूरज मेश्राम, ओम काकडे, संजय ढोके, आश्रय ढोके आणि प्रशांत अहिरकर यांच्यासह गावातील युवकांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला चनोडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर