ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

हिरापूर येथे  शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी

101 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
       [88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील हिरापूर नवीन येथे शिवमुद्रा युवा मंच व हिरापूर ग्रामवाशी कडून शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .शालेय विद्यार्थ्यांसाठी कला, गुणांना वाव मिळण्यासाठी  विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.सायंकाळच्या सुमारास गावातून वाद्यांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली व मुख्य चौकात शिवजयंती निमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष पाईलवार , कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून निवृत्त शिक्षक प्रकाश दिकोंडवार,प्रमुख पाहुणे व मार्गदर्शिका प्रा. कल्पना पवार ,प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक रामदास पाईलवार ,प्रा. डॉ.विठ्ठल पाईलवार ,उपसरपंच लक्ष्मीबाई गोडे, मिनाराम पाईलवार ,शालीक उटलावार ,व इतर ग्रा.प .पदाधिकारी व इतर  मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात काही शालेय विद्यार्थ्यांनी गीत व भाषणे व पोवाडे सादर केली.

उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवन कार्य , इतिहास,त्यांनी केलेला पराक्रम,राजकारण ,लोकाभिमुख शासन , त्यांच्यात असलेली दूरदृष्टी ,तत्कालीन व आजची परिस्थिती व राजकारण ,शिवाजी महाराज यांचे कार्य व जनकल्याणाची भावना आजच्या राज्यकर्त्यासाठी कशी दिशादर्शक व मार्गदर्शक आहे हे आपल्या भाषणातून उपस्थित लोकांना सांगितले .या कार्यक्रमा दरम्यान स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे ही वितरित करण्यात आली.

निवृत्त शिक्षक रामदास पाईलवार यांच्या कडून शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी असे काही शालेय साहित्य भेट देण्यात  आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक पाईलवार यांनी केले.या कार्यक्रमाला शिवमुद्रा समिती चे अध्यक्ष प्रदीप नाईनवार, उपाध्यक्ष विनोद कंडेलवार, सचिव रोहन गोडे, कोषाध्यक्ष प्रशिक बद्रे, सह इतर कार्यकर्ते  उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी संजय गोडे, सौरभ काटकर, निखिल गाडामोडे, जगदीश पाईलवार ,साहिल नाईनवार ,संजय मेश्राम ,मनोहर मेश्राम  सह इतर सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली .कार्यक्रमासाठी गावातील महिला ,पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे  आभार प्रदर्शन गणेश टेकाम यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर