ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

साहेब,रेशन दुकानातून दिलेली साडी ठिगळं लावून नेसायची का?

199 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्थाजून  येथील रेशन दुकानतून मिळाल्या फाटक्या साड्या

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी

झरी जामणी राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारक कुंटुबाना राज्य सरकारने दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.या नुसार कुटुंबांतील महिलांना आज तालुक्यात अनेक ठिकाणी साड्या चा वाटप करण्यात आला आहे.परंतु मार्थाजून दुकानातून लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या साड्या फाटक्या निघाल्या असून लाभार्थ्यानी रोष व्यक्त आहे.

शासनानेनिश्चित केलेल्या सणाच्या वेळी दरवर्षी एक साडी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे .सहकार पणन आणि वस्त्र उद्योग यांनी जारी केलेल्या निर्णयानुसार राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो.राज्य यंत्रमाग मंडळ ही योजना राबवत असून २०२३ -२४ या वर्षा करिता महामंडळाने ही साडी ३५५ रुपयात खरेदी केली आहे.उत्पादन,वाहतूक,जाहिरात प्रसिद्ध,साठवणूक , हमाली येणारा खर्च महामंडळाला शासनाकडून देण्यात येणार आहे.

नुकताच या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.मार्थाजून येथील रेशन दुकातून लाभार्थी साधना चंदू कुडमेथे या महिलेला मिळालेली  साडी फाटकी निघाल्याची माहिती मनसे तालुका उपाध्यक्ष काशीनाथ कुमरे यांच्या कडून मिळाली आहे.

ही योजना पाच वर्षा करिता आहे.मात्र सुरूवातीला शासन ३५५ रूपये खर्च करून डॅमेज साड्या वाटप करत आहे.गरिबांच्या नावाने योजनांचा मोठा गाजावाजा केला जात असतांना मात्र फाटकी वस्त्रे देवून शासन गरिबांची थट्टा तर करत नाही ना? असा सवाल जनसामान्यां कडून विचारला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर