ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अवघ्या चार तासात लावला हरवलेल्या मुलीचा छडा

134 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सूरेश पाचभाई मारेगाव,

सकाळी 6 वाजता शौचास जातो म्हणून घरून गेलेली अवघ्या 8 वर्षाची चिमुकली दोन तास झाले तरी घरी परत आली नाही. घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. शेवटी कुठेही आढळून न आल्याने वडिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मारेगाव पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवीत अवघ्या चार तासात या घटनेचा छडा लावत मुलीला शोधल्याने घरच्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

सविस्तर वृत्त असे की,
मारेगाव वार्ड नंबर 14 येथील अरुणा संजय मंजुळकर वय 8 वर्ष ही दिनांक 12 मार्च 2024 रोज मंगळवारला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान शौचास जातो म्हणून कोलगाव रस्त्याने गेली. ती बराच वेळ होऊन घरी परत न आल्यामुळे वडिलांनी परिसरात व नातेवाईकाकडे शोधाशोध घेतला असता तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे अखेर वडिलांनी लगेच मारेगाव येथील पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची तक्रार दाखल केली.

मारेगाव पोलिसांनी जलद गतीने तपास चक्रे फिरवत अवघ्या 4 तासाच्या आत सदर हरवलेल्या मुलीचा शोध लावला व तिला वडिलांच्या स्वाधीन केले.ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक प्रमोद जिद्देवार,जमदार आनंद आलचेवार,होमगार्ड महेश जूनघरी यांनी शोध मोहीम पूर्ण केली.या घटनेमुळे मारेगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर