ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी  कारावासाची शिक्षा

145 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी :- उपसंपादक
विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क झरी (जामणी)

झरी जामणी :- शासकीय कामात अडथळा करून शासनाचे आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपी नामे अरुण मारोती येवले रा.अडेगाव ता.झरी जामणी जि.यवतमाळ यास एक महीना साधा कारावास व सहाशे रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एस.वाढई यांनी दी. १५/०३/२०२४ रोजी  सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे कि.
दि.०९.१०.२०१८ रोजी न्यायालयातील बेलीफ हा वि.न्यायालयाच्या आदेशानुसार  मौजा अडेगाव ता.झरी जि यवतमाळ येथील वार्ड क्र.४ मधील घर क्र.३ या आरोपीच्या घराचा ताबा नि.धनको यास देण्याकरिता पोलीस स्टेशन मुकुटबन येथील पोलीस कर्मचारी, अडेगाव येथील सरपंच व पोलीस पाटीलसह अडेगाव येथे जावुन ताबा कारवाई करीत असताना आरोपीस तोंडी समज दिल्यानंतर सुद्धा आरोपीने तुमच्याने जे होते ते करून घ्या मी ताबा देत नाही असे म्हणत शासकीय कामात अडथळा निर्माण करुन शासनाचे आदेशाचे उल्लंघन केले.

वरुन सदर घटनेची तक्रार न्यायालयीन बेलीफ यांनी पोलीस स्टेशन मुकुटबन येथे दिली वरुन पोलिसांनी आरोपी  विरुद्ध भादवि चे कलम ३४१,१८६,१८८ अंतर्गत गुन्हा नोंद केला व सदर गुन्ह्याचा तपास पोलीस जमादार अशोक नैताम यांनी करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी यांचेसह आठ साक्षदारांचे बयाण नोंदविण्यात आले बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी यास वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे.यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील पी.डी.कपुर, ठाणेदार संतोष मनवर यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी ए.एस.आय मारोती टोंगे व नापोका संतोष मडावी यांनी काम पाहिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर