ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी

90 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अनेक शेतकऱ्याचा शेतमालाला फटका

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,


मारेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसात तापमानात कमालीचा बदल झाला होता त्यातच काल दिनांक १७ मार्च २०२४ रोज रविवारला   रात्री ८:३० वाजताच्या सुमारास गारा सह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.

असुन तालुक्यातील बोटोनी परिसरातील बुरांडा, हटवांजरी,खापरी,खडकी घोडदरा सह अनेक गावात गारा सह अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्याचा गहु,ज्वारी या सह अनेक पिकांना याचा फटका बसला आहे.तालुक्यात गेल्या काही दिवसा पासून वातावरणात कमालीचा बदल दिसुन आला तर काल रविवारला रात्री ८:३० वाजताच्या सुमारास गारा सह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

तब्बल एक तास पावसाची रिमझिम सुरू होती.या मुळे शेतकरी आणखी एकदा आस्मानी संकटात सापडला आहे. हाता तोंडाशी आलेला शेतमाल जाण्याच्या मार्गावर आहे.अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

अवकाळी पावसामुळे व गारा मुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके वाया गेली असुन नुकसान झालेल्या भागातील पिकांचे पंचनामे तातडीने करण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहे. व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर