ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

झरी जामणी येथील शेतकऱ्यांचे फार्म कप प्रशिक्षण उत्साहात संपन्न

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी : पानी फाउंडेशन, कृषी विभाग व संपूर्ण महाराष्ट्र उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या अनुषंगाने झरी जामणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण नुकतेच पार पडले. दिनांक 19 ते 21 जानेवारी 2026 दरम्यान महारोगी सेवा समिती, आनंदवन (वरोरा) येथे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षणात झरी जामणी तालुक्यातील 37 गावांमधील 47 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. पानी फाउंडेशन अंतर्गत आयोजित या प्रशिक्षणामध्ये शेतातील खर्च कसा कमी करावा, उत्पादनात वाढ कशी साधावी, रासायनिक व विषारी औषधांचा वापर कमी करून जैविक कीटकनाशकांचा उपयोग, तसेच शास्त्रशुद्ध व जैविक पद्धतीने शेती कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पांढरकवडा उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. नींगोट, तालुका कृषी अधिकारी श्री. दासरवार, मंडळ कृषी अधिकारी श्री. इंगोले, श्री. पवार तसेच उपकृषी अधिकारी श्री. मोघे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कमी खर्चात आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रशिक्षणाचे नियोजन कृषी विभागाचे सहायक कृषी अधिकारी श्री. राजु राजुरकर व पानी फाउंडेशनचे क्षेत्र अधिकारी श्री. राजु कांबळे यांनी केले. प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना नव्या शेती तंत्रज्ञानाची ओळख होऊन आत्मविश्वास वाढल्याची भावना सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर