ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

रेतीची अवैध तस्करी करणारे 2 ट्रॅक्टर हीवरा (म) मार्डी रस्त्यात जप्त

125 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महसूल विभागाची धडाकेबाज  कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील नदी,नाल्यांतून रेतीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे.त्यातच महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर असल्याने या रेती तस्कराविरूध्द तहसीलदार ऊत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या महसूल पथकाने रेती तस्करावर कारवाईचा सपाटा लावला  आहे.

या आधी अनेक ट्रॅक्टर, ट्रक,जेसीबी जप्त करून गुन्हा दाखल केल्यानंतर हे मुजोर रेती तस्कर मानायला तयार नाही. अशातच दोन ट्रॅक्टरवर आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली. मारेगाव तालुक्यातील हिवरा –  मजरा ते मार्डी रस्त्याने विना परवाना अवैध वाहतुक करतांना 2 ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असुन वाहन चालकांनी वाहन सोडून पोबारा केला आहे. सदरची कारवाई उत्तम निलावाड तहसीलदार मारेगांव,तलाठी विवेश सोयाम,शनी कुडमेथे,विकास मडावी यांनी आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोज बुधवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास  केली.

मार्डी परिसरामधील रात्रीच्या काळोख्या अंधाराचा फायदा हे रेतीतस्कर मोठ्या प्रमाणावर घेऊन रेती चोरून नेली जात होती.अशातच काल रात्री पासुन पथक पत्त्यावर असताना सकाळच्या सुमारास 2 ट्रॅक्टर सह ट्राली संशयास्पद अवैद्य वाहतूक करताना आढळून आला. अशी माहिती पथकाने दिली.

दोन्ही  ट्रॅक्टर ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई साठी मारेगाव तहसील कार्यालयाला आणण्यात आले .त्यामुळे मारेगाव महसूल विभागांच्या सततच्या कारवायामुळे रेती तस्करांमध्ये चांगलीच दहशत पसरल्याचे चित्र आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर