ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

धुलीवंदनच्या मुहूर्तावर उद्या ला बोरी(गदाजी) येथील भव्य गोटमार यात्रा उत्सव.

97 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे होलिका पर्वावर 2 दिवसीय यात्रा महोत्सव उद्याला शुक्रवार  दिनांक 18 मार्चला सुरु होत असुन ही गेल्या अनेक वर्षांपूर्वी पासुन परंपरा आहे.

बोरी (गदाजी) येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन राज्यासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावाच्या बाजूला लागूनच असलेल्या वाहणाऱ्या छोट्याश्या नदीत श्री गदाजी महाराज यांचे मंदिर असून धुलीवंदणाच्या दिवशी येथे 2 दिवसीय यात्रेचे आयोजन कमेटी तर्फे करण्यात येते.

उद्याला धुलीवंदनाच्या दिवसी येथील मंदिराच्या परिसरात सकाळी 8 वाजता कबड्डी खेड्ल्या जाते जो गडी शेवटी बाद होतो त्या गाड्याची अंतिम यात्रा संपूर्ण गावात वाज्या गाज्यात काढल्या जाते अशी माहिती गावकऱ्याकडून प्राप्त झाली आहे. त्या नंतर त्याला मंदिर परिसरात आणल्या जाते. व त्या नंतर प्रसिद्ध गोटामार खेळल्या जाते. मंदिरा शेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात. मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर दगडाने गोटमार करतात. तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर दगडाने गोटमार करीत असुन जवळपास सुमारे 1 ते 2 तास हा खेळ सुरू असतो.जेव्हा एखाद्या भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त जमिनीवर कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात. त्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकरीऱ्या कडून प्राप्त होते.

गोटमारची परंपरा जोपासत ही यात्रा कोरोणाचा कालावधी सोडला तर सातत्याने भरवल्या जात होती शनिवार दिनांक12 मार्चला घटस्थापणा करण्यात आली आहे. तर उद्याला शुक्रवार दिनांक 18 मार्च रोजी सकाळी गोटमार व त्या नंतर काला करण्यात येणार आहे व 21 मार्च ला पाखड पुजा करण्यात येणार आहे.
या दरम्यान यात्रेच्या आयोजनाची तयारी पुर्ण झाली असुन भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्तांनी आवाहन केले आहे….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर