ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मजरा येथील 32 वर्षीय युवकाने घेतले विष उपचारादरम्यान झाला मृत्यू

2.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील मजरा येथील 32 वर्षीय युवकाने विषाचा घोट घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना मारेगाव तालुक्यातील मजरा येथे घडली. विष घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव रुपेश शामसुंदर आत्राम वय सुमारे 32 वर्ष असे असुन रुपेश हा तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी होता.

पण मागील दोन ते अडीच वर्षांपूर्वी तो तालुक्यातीलच मजरा या गावी आपल्या आईच्या माहेरी राहायला आला होता. तिथे तो रोज मजुरी आणि इतर कोणतेही काम करून आपली उपजीविका करायचा.दोन वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. रुपेशचे लग्न बुटीबोरी येथील एका युवतीशी झाले होते. पाच ते सहा महिन्यांपूर्वीच त्याचा आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

त्याने काल दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोज बुधवारला मार्डी येथे चौकामध्ये दुपारच्या सुमारास विष घेतले. ही गोष्ट काही लोकांना माहीत होताच त्याला त्याचे नातेवाईकांचे मदतीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला वणी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु वणी येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई असून त्याचेवर आज दि.10 ऑक्टोबरला मजरा येथे अंत्यविधी करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर