ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मनस्वी पिंपरे राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.

57 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगांव: नुकताच घाटकोपर मुंबई येथे राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 2023 हा सोहळा पार पडला असून, ज्ञान उपासना शिक्षण प्रसारक संस्था मुंबई यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक,सामाजिक, साहित्यिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देण्यात येतो.

यावर्षी मनस्वी विशाल पिंपरे या पाच वर्षाच्या मुलीला स्केटिंग मधील उत्कृष्ट कामगिरी व एतिहासिक जागतिक विक्रमाकरिता राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार देण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रीय न्याय मंत्री मा.रामदासजी आठवले व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा.मंगल प्रभात लोढाजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मनस्वी ने आत्तापर्यंत स्केटिंग मधून केलेल्या अष्टपैलू कामगिरी करिता तिची या पुरस्काराकरिता खास निवड करण्यात आली. मनस्वी सध्या मारुती बधे मेमोरियल स्कूल येथे शिकत असून प्रशिक्षक विजय मलजी यांच्या मार्गदर्शनाखाली रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी कात्रज, पुणे येथे स्केटिंग प्रशिक्षण घेत आहे.ज्ञान उपासना शिक्षण संस्था अध्यक्ष स्वरूप नेटावटे यांनी तिची निवड केली होती.

ज्ञान उपासना शिक्षण प्रसारक संस्थेने 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गुणगौरव पुरस्कार दिला असू दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कला व कौशल्य प्रशिक्षण देण्याचे ध्येय ठेवले आहे असे संस्थेचे अध्यक्ष स्वरूप नेटावटे यांनी सांगितले.मनस्वीला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर