ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

वेगाव येथील 40 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

1.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

डोंगरगांव येथील स्वतःच्या शेतात केली आत्महत्या

मारेगाव तालुका प्रतिनिधी:-प्रमोद रा.मेश्राम

मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.वेगाव येथील एका 40 वर्षीय व्यक्तिने डोंगरगांव ता.वणी येथील स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 रोज गुरुवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की..
संतोष लटारी धोटे वय सुमारे 40 वर्ष रा.वेगाव ता.मारेगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असुन त्याच्या वडिलांच्या नावाने डोंगरगांव शेत शिवारात 4 एकर शेती असल्याची माहिती आहे.तो शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.बातमी लीहिपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

संतोष हे काल सायंकाळी वेगाव येथुन घरी डोंगरगांव येथील शेतात जातो असे सांगुन शेतात गेले होते.पण बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाही त्या मुळे कुटुंबातील काही सदस्य शेतात गेले असता त्यांना संतोष यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसले. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती लगेच वणी पोलिसांना दिली.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणी साठी रात्री वणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले मृतक शेतकरी संतोष यांचे पश्चात आई, वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करत आहे.संतोषवर वेगाव येथील निर्गुळा नदीच्या काठावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर