ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

महांकाली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

586 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ स्तरिय खंजेर भजन स्पर्धेत राज्याबाहेरील मंडळांनी घेतला सहभाग

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,

झरी येथून हाकेच्या अंतरावर जामणी येथे महांकाली देवीचे ३०० वर्षा पूर्वी पासूनचे पुरातन मूर्तीचा जीर्णोद्धार २००७ मध्ये प्रकाश मॅकलवार यांनी केला असून तेव्हापासून या महांकाली मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेतल्या जात असून या महांकाली मंदिराला पंचक्रोशीतील भाविक भक्त मंदिरात शनिवारपासून ते दसऱ्यापर्यंत महांकाली देवीच्या दर्शनाकरिता आश्विन नवरात्रौत्सव महिन्यात येतात

प्रकाश भाऊ मॅकलवार हे देवीचे भक्त असल्याने नवरात्रमध्ये देवीची आराधना व विविध कार्यक्रम घेतल्या जात आहे यावर्षी महांकाली मंदिराच्या आयोजकांनी दि . ५ व ६ आक्टोबर रोजी विदर्भ स्तरीय  खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.वर्धा ,नागपूर, अमरावती,अकोला , बुलठाणा ,नांदेड , वाशिम,चंद्रपूर,गडचिरोली  भंडारा इ. जिल्ह्यातून भजन मंडळ तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील तेलंगणा राज्यातील अशा एकूण पंचेचाळीस भजनी मंडळ सहभागी झाले होते.

पुरुष गटांमधील प्रथम क्रमांक आदर्श भजन मंडळ निमगव्हाण जि अमरावती ,द्वितीय क्रमांक सार्थक भजन मंडळ हस्तापूर जि. यवतमाळ ,राष्ट्रसंत भंजन मंडळ जनुना जि.वाशीम यांनी तृतीय क्रमांक चे गुण संपादन करून पारितोषिक पटकावले आहे.महिला व बाल स्पर्धकातून प्रथम क्रमांक जय भवानी महिला भजन मंडळ नेहरू नगर अमरावती,व्दितीय क्रमांक जिजाऊ महिला भजन मंडळ चंद्रपूर , तृतीय क्रमांक नवदुर्गा महीला भजन मंडळ देवळी वर्धा यांनी मिळवला आहे .परिक्ष म्हणून प्रा.जितेंद्र जुनगरे व श्री मधुकर गेडाम यांनी काम पाहिले.परिसरातील गुरुदेव प्रेमी यांनी दोन दिवस भजनाचा आनंद घेतला .

या नवरात्र उत्सवामध्ये झरी जामणी येथील नागरिकांनी मोलाचे सहकार्य करीत आहे व प्रकाश भाऊ मॅकलवार यांनी विशेष योगदान दिले आहे .या नवरात्री उत्सवामध्ये रोज सकाळी५-३० व संध्याकाळी ७-०५ वाजता आरती होत असून रात्री ९ ते १० वाजता कीर्तनकार हभप प्रशांत भोयर महाराज यांचे भजन व कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे.

या महांकाली मंदिरात विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या मंदिरात घटस्थापनेपासून ते दसरादरम्यान अश्विन नवरात्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.तसेच येथे विविध धार्मिक अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. व या मंदिराचे सेवेकरी म्हणून विठ्ठल महाराज लक्ष्मण कोरांगे व देवराव वाडगुरे हे भाविक भक्तांना सेवा देत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर