ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराचा झंझावात

906 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मांगरुळ येथील सरपंचाचा खाडे यांना पाठिंबा

तालुका प्रतिनिधी वणी

वणी – रविवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराची तोफ धडाडली. नरेंद्र ठाकरे व गौरीशंकर खुराणा, संजय आवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय खाडे यांनी मारेगाव तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. कोलगाव व मांररुळ येथे भव्य रॅली व प्रचार सभा घेण्यात आली. या रॅलीत हजारो लोकांनी सहभाग घेतला. प्रचार सभेत संजय खाडे यांनी विकासाची ब्यू प्रिंट तयार असून फक्त एक संधी द्यावे असे आवाहन मतदारांना केला. यावेळी शिट्टी वाजवून गावक-यांनी संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.

आज दिनांक 11 नोव्हेंबर 2024 वार रविवार रोजी प्रचाराचा ताफा मारेगाव तालुक्यात पोहोचला. मांगरूळ या गावातून प्रचाराला सुरुवात झाली. मांगरुळ येथील रहिवाशांनी वाजत गाजत संजय खाडे यांचे स्वागत केले. नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराणा, संजय आवारी यांनी प्रचारात सहभाग घेतला. तर कोलगाव येथील मंदिरात दर्शन घेऊन कोलगाव येथील प्रचाराला सुरुवात झाली. कोलगाव येथील रहिवाशी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले. नागरिकांनी संजय खाडे यांना मतदान करू असे आश्वासन दिले.

मांगरुळ येथील सरपंचाचा खाडे यांना पाठिंबा
मंगरूळ गावाचे सरपंच प्रमोद केशव आत्राम यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. संजय खाडे हे नेहमी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जातात. त्यांनी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवले. जनहित केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे रखडलेले कामे पूर्ण केलीत. त्यांच्या या कार्यामुळे पाठिंबा जाहीर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मांगरुळ येथील प्रचारामध्ये सहभाग घेतला. तसेच ते संजय खाडे यांचा प्रचार करणार असे जाहीर केले.

प्रचार सभेत बोलताना नरेंद्र ठाकरे म्हणाले की शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. शेतक-यांनी यावेळी संजय खाडे यांच्या पाठिशी उभे राहावे. संजय खाडे हे शेतकरी आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक शेतक-यांचे प्रश्न सुटले. त्यांना शेतक-यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या शेतक-याला विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. सभेत गौरीशंकर खुराणा यांनी सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टिका केली. गॅस, तेल याचे दर वाढवून बहिणीचे स्वयंपाकघर महायुती सरकारने वाढवले. अशी टिका त्यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर