ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

तब्बल 34 वर्षांनंतर एकत्र आलेत शालेयविद्यार्थी

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तीन तपांनंतर मिळाला गतस्मृतींना उजाळा

विवेकांनद विद्यालयाच्या १९९२ च्याबॅचचे स्नेहमिलन उत्साहात

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क, वणी

वणीः शाळेची घंटा वाजताच प्रार्थनाझाली. वर्गात येण्यापूर्वी प्रवेशद्वारावरच शिक्षकांचं थाटात स्वागत झाले. सर्वचशिक्षक आणि विद्यार्थी वर्गात गोळा झालेत. कोणी पुढील शिक्षणासाठी गाव सोडले. कोणीनोकरी, व्यवसायानिमित्तखूप दूर गेले होते तिथेच स्थायिक झालेत. सत्र १९९१-९२चे दहावीचे विद्यार्थीरविवारी विवेकानंद विद्यालयात स्नेहमिलनासाठी एकत्र झालेत.

तब्बल ३४ वर्षे उलटूनगेल्यानंतरही त्यांच्यातील मैत्रीचा ओलावा मात्र कायम राहिला. शाळेत वर्गमित्रांशीजुळलेली नाळ तशीच राहावी… सर्वांनी पुन्हा एकदा भेटावे… एकमेकांबाबत जाणूनघ्यावे… हितगुज करावे यासाठी विवेकानंद विद्यालयातील वर्गमित्रांचा स्नेहमिलनसोहळा रंगला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीसेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण सा. गंगशेट्टीवार होते. मार्गदर्शक म्हणून हरीभाऊ चिखले, वामन घु. मिलमिले,अनंत एकरे, गणपतराव पारखी, तिलोत्तमा भेदोडकर, स्नेहलता चुंबळे भास्कर काळे,  प्रदीप सुंकुरवार, दि. ह .लोणारे, प्रे. रा. राठोड, नवनाथ नगराळे, रामकृष्ण बोबडे, दिलिपराव आस्कर, आदी शिक्षक उपस्थित होते.

सर्व शिक्षकांचा सत्कार संतोष बेलेकर, मंगेश करंडे, वैभव आत्राम, योगेश खिवंसरा, अमितकळमकर, राहुल रेगुंडवार, विनोद कापसे,सारंग काळे, अविनाश दोडके, अमर देवाळकर, सचिन मत्ते, ताराचंदघारापुरे, जितेश खाडे, विजय गाडगे,ईश्वर मालेकर, अनिल मस्के, संतोष सूर, सरिता दुबे तिवारी,

योगेश खारकर, संतोष मत्ते, राजूकाळे, राजेश मांडवकर, उमाकांत बदखल,प्रमोद झिले, विकास वैद्य आदींनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सर्व शिक्षकांनी सत्काराला उत्तर देतमार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी यानिमित्त शाळेला एक भेटवस्तू प्रदान केली. याप्रसंगी दिवगंत शिक्षक आणिविद्यार्थ्यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मंगला गोहणेभोयर आणि सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी केले.

प्रास्ताविक सुलक्षणा भोंगळे यांनीकेले. अमित कळमकर ह्यांनी अतिथींचा परिचय करून दिला. आभार मंगेश करंडे यांनी केले. व्यवस्थापन प्रमुख संतोष बेलेकर होते. आयोजनासाठी कवितामानकर, अंजू येवले,शारदा ढेंगळे, कविता दिकुंडवार, किरण चिंडालिया, प्रकाश काशीकर,अनघा कोंडावर, दुर्गा वाटमोडे, भारती शर्मा, राधा थेरे  यांच्यासह सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्यकेले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर