ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला,ना अद्याप पुनर्वसन

312 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा

तालुका प्रतिनिधी वणी

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण व योग्य मोबदला मिळाला नाही. अनेक विस्थापितांच्या पुनर्वसनाची समस्या कायम आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

येत्या आठवड्यात मागण्या मान्य न झाल्यास उकणी येथील पीडित शेतक-यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी पासून चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जाग्राम टाडाळी येथील क्षेत्रिय महाप्रबंधक कार्यालयासमोर ते आमरण उपोषण करणार आहेत.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. पीडित शेतक-यांच्या आंदोलनाला कामगार व शेतकरी नेते संजय खाडे यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

मौजा उकणी, बेलसणीसह परिसरातील शेकडो एकर जमीन वेकोलिने संपादित केली. त्यातील उकणी या गावाची पुनर्वसन प्रकिया शेवटच्या टप्पात आहे. मात्र बांधकाम विभागाने घरांचे मुल्यांकन करताना जो दर लावला आहे तो 10 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अतिशय अल्प मोबदला मिळत आहे.

या मोबदल्यात घरं बांधणं अशक्य आहे. त्यामुळे 2025 च्या सीएसआर रेट नुसार घरांचे मुल्यांकन करून ज्या दिवशी सेक्शन 11 लागले त्या दिवसच्या बांधकाम मूल्यांकना च्या रेट 12% व्याज दर करण्यात येऊन 2025 पर्यंत रक्कम देन्यात यावी शेतक-यांना योग्य मोबदला द्यावा, उकणी, खंड नं.1 मधील उर्वरित जमीन विनाअट निलजई डीप विस्तारीकरणासाठी तत्काळ संपादित करावी, तसेच भुधारकांना मोबदला व नोकरी द्यावी. अशी मागणी वेकोलिच्या क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

शेतक-यांच्या लढ्यासाठी आम्ही सज्ज – संजय खाडे
जमीन म्हणजे शेतकऱ्यांचा प्राण आहे. आपल्या परिसरातील नागरिकांची उपजिविका ही शेतीवरच अवलंबून आहे. शेतक-यांनी वेकोलिला आपली जमीन व घरं दिलीत. मात्र प्रशासन योग्य मोबदला न देता सुळावरची पोळी खात आहे. लोकप्रतिनीधी देखील मूग गिळून गप्प आहेत. जगाच्या पोशिंद्याला असे अगतिक होऊ देणार नाही. त्यासाठी कोणत्याही लढ्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.

यापूर्वी पुनर्वसन व योग्य मोबदल्यासाठी अनेकदा लेखी निवेदन देण्यात आलीत. मात्र त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे अखेर शेतक-यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. निवेदनावर पुरुषोत्तम भुसारी, मंगेश खापणे, सुरेश वी, विलास खापने, अर्जुन खापने, कैलास खरवडे, सुरेश जोगी, नानाजी ढवस, किसन पारशिवे, पद्माकर झाडे, पराग तुराणकर, बालाजी वाढई, विकास लालसरे, संजय बांदुरकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर