ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन

519 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जो शिक्षणाचा प्रचार करतो, तोच समाजाचा उद्धार करतो – संजय खाडे

तालुका प्रतिनिधी वणी,

वणी – शिक्षण ही मानवाची मुलभूत गरज आहे, शिक्षण घेतले तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे; ही शिकवण महात्मा जोतीबा फुले यांनी समाजाला दिली. विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ता,विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्वेने केले.असे महात्मा फुले सांगायचे.जो शिक्षणाचा प्रचार करतो, तोच समाजाचा उद्धार करतो.त्यामुळे शिक्षणाचा अधिकाधिक प्रचार व प्रचार झाला पाहिजे.असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले.

वणीतील जटाशंकर चौक येथील महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रशांत गोहोकर यांची प्रमुख उपस्थिती होती.संजय खाडे फाउंडेशन संचालित महात्मा फुले अभ्यासिका येथे 28 नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.

सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.या वेळी संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी तसेच शिक्षण व समाजसुधारणेच्या कार्यासाठी संजय खाडे फाउंडेशन सदैव तत्पर राहील,असे वचन खाडे यांनी दिले.प्रशांत गोहोकर यांनी महात्मा फुले यांची समाजसुधारणा,शैक्षणिक कार्याचे महत्त्व आणि आजच्या काळातील शिकवण यावर विचार मांडले.

कार्यक्रमाला सूरज गौरकार, निखिल तुरणकर, अक्षय नालमवार, देवांश आसकर, निखिल गानफाडे, शीतल बोर्डे, कुणाल भेले, आकाश घोरपडे, अनिकेत थेरे, दीपक माडेवार, प्रदीप सातपुते, स्वप्निल सातपुते, विवेक खिरटकर, संतोष ताडुलवार, नीतेश विंचू,अमित काळे, शंकर उपरे, शुभम राठोड, दीपक पथाडे, हर्षल मोहितकर यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनचे स्वयंसेवक व अभ्यासिकेचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर