ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

खापरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचे उत्साहात अनावरण

1.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे यांच्या हस्ते उद्घाटन

इंजिनियर सुरेश पाचभाई यांचा पुढाकार

प्रमोद रा. मेश्राम मारेगाव

मारेगाव तालुक्यातील खापरी ह्या छोट्याशा गावात भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण उत्साहात साजरे करण्यात आले. मारेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे यांचे हस्ते सदर अनावरण आज दिनांक 1 डिसेंबर 2024 रोज रविवारला दुपारी 12 वाजता करण्यात आले. सुरेश पाचभाई यांचे पुढाकाराने व गावकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी गावातील युवक – युवती छोट्या मुलांसह, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.उत्साहाच्या वातावरणात संपूर्ण गावात भगवे झेंडे लावुन फटाक्याची आतिषबाजी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.संपूर्ण गावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

गावातील सर्वांनी शिवभक्त सुरेश पाचभाई यांचे भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे स्वखर्चाने अनावरण केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.

यावेळी, पांडुरंग पाचभाई,मारोती पाचभाई,संतोष आवारी, दुर्वास राजूरकर,प्रभाकर कुचनकर, सुरेश पाचभाई, अजय वासेकर,संदिप गुंजेकार,विठ्ठल पाचभाई, बंडुजी गुंजेकर,रामकृष्ण कुचनकर, बाबाराव कुचनकर, शंकर पाचभाई,प्रवीण कुचनकर,रोशन गुंजेकार,लक्ष्मण कुचनकर, संकेत पाचभाई,विनोद कुचनकर,शंतनु पाचभाई,

पवन उरवते, गौरव पाचभाई,राहुल कुचनकर,सार्थक पाचभाई, मारोती गुंजेकर,हितेश पाचभाई, भीमा कुचनकर, ओकार पाचभाई, प्रज्वल पाचभाई, सुनील आवारी, प्रणय पाचभाई, समीर गुंजेकर, गुलाब काळे, पवन पाचभाई,केशव कुचनकर, किसन, कुचनकर, शुभम प्रकाश कुचनकर, यांचे सह गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर